12 जूनला Chandrababu Naidu घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Chandrababu Naidu आणि Nitish Kumar हे दोन नेते सध्या देशाच्या राजकारणातील किंगमेकर आहेत. त्यामुळे देशाच्या शपथविधीसाठी राज्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

186
12 जूनला Chandrababu Naidu घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
12 जूनला Chandrababu Naidu घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

तेलगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आगामी 12 जून रोजी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी 9 जून रोजी हा शपथविधी होणार होता. परंतु, आता तारखेत बदल करण्यात आलाय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता असल्याची माहिती टीडीपीच्या सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – रशियातील St. Petersburg Assembly आणि Maharashtra Legislature सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या)

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार किंगमेकर 

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार (Nitish Kumar) हे दोन नेते सध्या देशाच्या राजकारणातील किंगमेकर आहेत. त्यामुळे देशाच्या शपथविधीसाठी राज्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. मोदींनी बुधवारी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे राजीनामा पत्र सादर केले होते. राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना कार्यवाहक पंतप्रधान रहाण्याची विनंती केली. या वेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात यश आलेले नाही. चंद्राबाबू नायडू एनडीए आघाडीसाठी किंगमेकर आहेत. एनडीएने सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवण्याचा विक्रम केला आहे. युतीचे सरकार स्थापन करण्यात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे महत्त्वाचे योगदान असणार आहे.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात तेलगु देसमने (टीडीपी) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. टीडीपीने 135 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला. जनसेनेला 21 जागा मिळाल्या. तर भाजपला 8 जागा जिंकण्यात यश आले आहे. तेलुगू देसम पक्ष 1996 मध्ये पहिल्यांदा एनडीएचा सहभागी झाला होता. चंद्राबाबू नायडू यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केले होते. एवढेच नाही, तर तेलगु देसम पक्षाने आंध्रमध्ये 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही भाजपसोबत लढल्या होत्या, पण 2019 मध्ये टीडीपी एनडीए पासून वेगळी झाली होती. परंतु, 2024 मध्ये टीडीपीला दुसरा मोठा पक्ष बनून पुन्हा एकदा एनडीएत सहभागी झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.