Powai Bheemnagar : त्या दगडफेकीत महापालिकेच्या अभियंत्यांसह मजूर आणि १५ पोलीस जखमी

203
Powai Bheemnagar : त्या दगडफेकीत महापालिकेच्या अभियंत्यांसह मजूर आणि १५ पोलीस जखमी

पवईतील अतिक्रमण निर्मूलन कारवाईप्रसंगी महानगरपालिका पथकावर झालेल्या हल्ल्यात महानगरपालिकेचे ५ अभियंते, ५ मजूर व त्यासोबत १५ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास कर्मचाऱ्यांना दिला. (Powai Bheemnagar)

पवईगाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० इतक्या झोपड्या असलेली ‘लेबर हटमेंट’ तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आली होती. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने मुंबई महानगरपालिका प्रशासनास दिले होते. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार या झोपडपट्टी धारकांना यापूर्वी देखील नोटिस देण्यात आल्या होत्या, असे महापालिका प्रशासनात स्पष्ट केले आहे. (Powai Bheemnagar)

(हेही वाचा – NCP : अजित पवार गटाच्या आमदारांवर जयंत पाटील यांचे मौन)

तसेच, मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ४८८ तरतुदीनुसार, या झोपड्यांच्या कब्जेदारांना शनिवार, ०१ जून २०२४ रोजी कायदेशीर नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. ४८ तासांच्या आत स्वत:हून ही अतिक्रमणे निष्कासित न केल्यास महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले होते. याचाच अर्थ, महानगरपालिका प्रशासनाने विहित प्रक्रिया पूर्ण केली तसेच आगाऊ सूचना देऊन पुरेसा वेळही दिला होता, असेही प्रशासनाने म्हटले आहे. (Powai Bheemnagar)

त्यानुसार, गुरूवारी ०६ जून २०२४ रोजी महानगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरू केली. या कारवाईप्रसंगी स्थाानिक रहिवाशांनी विरोध करत दगडफेक केली. या घटनेत महानगरपालिकेचे ५ अभियंते, ५ मजूर व त्यासोबत १५ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, कायद्याचे पालन करुन ही कारवाईची मोहीम यापुढे देखील सुरू राहणार असल्याची भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Powai Bheemnagar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.