Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात तरुण खासदार कोण ?

Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील 48 खासदारांची नावे समोर आली आहेत. पण यामध्ये सर्वात श्रीमंत खासदार कोण? सर्वात तरुण खासदार कोण? याबाबत तुम्हाला माहिती आहे का ?

374
Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात तरुण खासदार कोण ?
Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात तरुण खासदार कोण ?

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील राज्यातील 48 खासदारांची नावे समोर आली आहेत. या खासदारांमध्ये कोण आहे सर्वांत श्रीमंत, कोण आहे सर्वांत गरीब ते जाणून घ्या.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महायुतीला राज्यात फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर महाविकास आघाडीने 31 जागांवर यश मिळावले आहे. राज्यातील 48 खासदारांची नावे समोर आली आहेत. पण यामध्ये सर्वात श्रीमंत खासदार कोण? सर्वात तरुण खासदार कोण? याबाबत तुम्हाला माहिती आहे का ? (Lok Sabha Election Results 2024)

(हेही वाचा – Pothole : यंदा खड्डा भरताना महापालिका काय घेणार काळजी, जाणून घ्या!)

सर्वात तरुण आणि सर्वात वयोवृद्ध खासदार कोण ?

राज्यातील सर्वात वयोवृद्ध खासदार काँग्रेसचे आहेत. कोल्हापूरचे 76 वर्षीय खासदार शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) हे राज्यातील सर्वांत वयोवृद्ध खासदार आहेत. शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव केला.

राज्यातील सर्वात वयस्क आणि तरुण खासदार काँग्रेसचाच आहे. नंदूरबारचे गोवाल पाडवी (Gowal Padavi) हे राज्यातील सर्वात तरुण खासदार आहेत. त्यांचे वय 31 वर्षे इतके आहे. त्यांनी भाजप उमेदवाराचा दारुण पराभव केला.

नीलेश लंके सर्वांत गरीब खासदार

नगरचे नीलेश लंके (Nilesh Lanke) राज्यातील सर्वांत गरीब खासदार आहेत. निवडणूक आयोगानुसार शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्यांकडे 7.8 लाख रुपयांची संपत्ती आहे. नीलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला.

श्रीमंत खासदार खासदार कोण ?

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे राज्यातील सर्वांत श्रीमंत खासदार आहेत. साताऱ्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचा 32 हजार मतांनी पराभव केला. उदयनराजे भोसले यांची संपत्ती तब्बल 223 कोटी रुपये इतकी आहे.

किती आहे संपत्ती ?

उदयनराजे, त्यांच्या पत्नी, मुले व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती 296 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे. त्यामध्ये, उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे.उदयनराजेंची एकूण स्थावर आणि जंगम संपत्ती 1 अब्ज 90 कोटी 93 लाख 64 हजार 634 रुपये आहे. तर, त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम मालमत्ता 6 कोटी 89 लाख 47 हजार 201 रुपये एवढी आहे. उदयनराजेंकडे १ कोटी ९० लाख ५ हजार १६५ रुपये किमतीच्या अलिशान गाड्या आहेत. १७२ कोटी ९४ लाख ४९ हजार ६९१ रुपये किमतीची शेतजमीन आहे. पत्नीकडे ३ कोटी ७९ लाख ३७ हजार ५७० आणि मुलाच्या नावे ३ लाख १४ हजार ८२० रुपये किमतीची जमिन आहे. भोसले कुटुंबियांकडे २८ कोटी ७९ लाख ४८ हजार ५६५ रुपये किंमतीची शेतजमीन असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे. उदयनराजेंकडे 30, 863 ग्रॅम सोनं चांदी, त्यांच्या पत्नीकडे 4750 ग्रॅम दागिने, कुटुंबाकडील सोने 628 ग्रॅम, तर मुलीचे सोनं 7054 ग्रॅम आहे. दरम्यान, उदयनराजेंवर 2 कोटी 44 लाख 63 हजार 842 रुपयांचे कर्ज आहे. (Lok Sabha Election Results 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.