उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना (Mumbai) आता प्रतिक्षा आहे ती मान्सूनची (Monsoon 2024). सध्या तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या तीन-चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच पुढील पाच दिवस राज्यांना हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे. (Monsoon 2024)
या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने (Monsoon 2024) संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असून येत्या तीन, चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Monsoon 2024)
उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका पाऊस (Monsoon 2024) पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Monsoon 2024)
मुंबई, ठाणेसह या भागात पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. (Monsoon 2024)
पुढचे ४ आठवडे मान्सूनचे
पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने (Monsoon 2024) संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Monsoon 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community