एनडीएचं (NDA) सरकार स्थापन होण्याआधी (Lok Sabha Election 2024 ) मंत्रिपदाची वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता सत्तास्थापना आणि मंत्रिमंडळाच्या चर्चा रंगल्या आहेत. नव्या सरकारमध्ये कोण कोण कॅबिनेट मंत्री असतील, याच्या चर्चा सुरु आहेत. त्याशिवाय प्रत्येक चार खासदारामध्ये एक मंत्रिपद असा फॉर्मुलाही ठरल्याची माहिती समोर आलेली आहे. (Lok Sabha Election 2024 )
महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार सर्वात महत्त्वाची खाती भाजप (BJP) स्वतःकडे ठेवणार आहे. प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं ठरलं आहे, अशी माहिती मिळतेय. चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचे 16 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना चार कॅबिनेट मंत्रिपदं (Lok Sabha Election 2024) मिळण्याची शक्यता आहे, तर 12 खासदार असलेल्या नितीश कुमारांच्या पक्षाला तीन मंत्रिपदं दिली जाण्याची चिन्हं आहेत. मात्र नेमकी कुठली खाती घटकपक्षांना देणार हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला प्रत्येकी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिलं जाईल असं समजतंय. (Lok Sabha Election 2024 )
शिवसेनेला एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद
नव्या मंत्रिमंडळात नितीश कुमार यांना तीन,चिराग पासवान आणि जिंतनराम मांझी यांच्या पक्षाला एक, चंदाबाबू नायडू यांच्या पक्षाला चार कॅबिनेट मंत्रीपदं मिळणार. शिवसेनेला एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद तर राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती भवनात शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. (Lok Sabha Election 2024)
मागणी काय?
बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा. त्यासोबतच चार कॅबिनेट मंत्रिपदे आणि चार राज्यमंत्रीपद मिळावी. अशी जेडीयूची (JDU) डिमांड आहे. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनीही आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने तीन कॅनिबेट मंत्रिपदे आणि दोन राज्यमंत्रीपद मागितली आहे. चिराग पासवान याच्या एलजेपी पार्टीने एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे मागितली आहेत. जीतनराम मांझी यांनी एक राज्यमंत्रीपद मागितले आहे. (Lok Sabha Election 2024 )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community