Lexus UX : मर्सिडिजला टक्कर देणारी लेक्सस कंपनीची ही हायब्रीड एसयुव्ही पाहिलीत का? 

Lexus UX : लेक्सस या प्रिमिअर कार कंपनीची ही गाडी इतर लेक्सस कारच्या मानाने परवडणारी तरीही मर्सिडिजशी स्पर्धा करणारी आहे 

229
Lexus UX : मर्सिडिजला टक्कर देणारी लेक्सस कंपनीची ही हायब्रीड एसयुव्ही पाहिलीत का? 
Lexus UX : मर्सिडिजला टक्कर देणारी लेक्सस कंपनीची ही हायब्रीड एसयुव्ही पाहिलीत का? 
  • ऋजुता लुकतुके

प्रिमिअम एसयुव्ही (Lexus UX ) गाड्यांची ज्यांना हौस आहे अशा लोकांसाठी लेक्ससने आपली नवीन लक्झरी कार लेक्सस युएक्स बाजारात आणण्याची तयारी चालवली आहे. भारतात कंपनी नवीन पिढीच्या ईव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याचंच पाऊल म्हणून ही हायब्रीड कार भारतात आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.  पेट्रोल इंधनावर चालणारी या कारचं इंजिन १९८७ सीसी क्षमतेचं आहे. या गाडीत ४ सिलिंडर असून ती पूर्णपणे ऑटोमेटिक कार आहे. गाडीत एकावेळी ५ लोक बसू शकतील. (Lexus UX )

(हेही वाचा- PUNE शहर पोलीस दलातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली झाली? जाणून घ्या)

तर हायब्रीड मॉडेल हे ३०० एच लिथिअम बॅटरीयुक्त असेल. आणि यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्याबरोबरच वीजेचा वापरही ८ टक्क्यांनी कमी होणार आहे. (Lexus UX )

विशेष म्हणजे या गाडीची भारतातील किंमत अंदाजे ४० लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. म्हणजेच इतर महाग लेक्सस कारच्या तुलनेत हा परवडणारा पर्याय कंपनीने समोर ठेवला आहे. (Lexus UX )

सुरुवातीला ही कार कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण, सध्या कंपनीने युएक्स कार ही पेट्रोल इंधनाच्या व्हरायटीमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि लेक्ससची पहिली इलेक्ट्रिक कार ही युएक्स ३०० ई ही असेल. (Lexus UX )

लेक्सस कार आपल्या देखण्या एक्टिरिअरसाठी प्रसिद्ध आहे. ही कारही त्याला अपवाद नसेल. बाहेरून स्टायलिश आणि आधुनिक दिसणारी ही गाडी आतूनही प्रशस्त आहे. गाडीला प्रभावी एलईडी हेडलँप देण्यात आले आहेत. तर गाडीची लांबी इतर गाड्यांपेक्षा १३ मीटर लांब आहे. (Lexus UX )

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ठरलं तर! एनडीएच्या मंत्रिमंडळात ४ खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद?)

ही गाडी आतूनही प्रशस्त आहे. आणि तिचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले १० इंच मोठा आहे. गाडी चालवण्याचा तुमचा अनुभव मात्र भन्नाट असेल असा कंपनीचा दावा आहे. कारण, शून्य ते १०० किमी ताशी इतका पल्ला गाठण्यासाठी कंपनी फक्त ०.७५ सेकंदं इतका वेळ घेते. (Lexus UX )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.