वातावरणात उष्णता वाढल्याने भाज्या, फळं आणि डाळी महागल्या आहेत. पाऊस पडेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत हीच स्थिती राहणार असल्याचं सांगितलं आहे. कांद्या पाठोपाठ आता टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात २७.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम शाकाहारी थाळीदेखील महागली आहे.
शाकाहारी थाळीतील कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या दरात वाढ झाल्यामुळे मे महिन्यात ही थाळी महागली आहे तसेच बॉयलरच्या दरात घट झाली आहे यामुळे मांसाहारी थाळी स्वस्त झाली आहे.
(हेही वाचा – PUNE शहर पोलीस दलातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली झाली? जाणून घ्या )
तांदूळ आणि डाळींच्या किंमतीतही वाढ
कांदे, टोमॅटो आणि बटाटे, भात, रोटी, डाळ, दही आणि कोशिंबीर यांचा समावेश असलेल्या शाकाहारी थाळीच्या किमतीत वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किंमतीत ३९ टक्के, बटाट्याच्या किंमतीत ४१ टक्के आणि कांद्याच्या किमतीत ४३ टक्के वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमतीत एकूण वाढ झाल्याचे अहवालाने नमूद केले आहे. बटाट्याचा दर महागल्याचं कारण पश्चिम बंगालमधून येणारी अवाक कमी झाली आहे तसेच रब्बी हंगामातील लागवड कमी झाल्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. तांदूळ आणि डाळींच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
बॉयलर चिकनच्या किंमतीत १६ टक्क्यांची घट
मांसाहारी थाळीतील अनेक घटक शाकाहारी थाळीसारखेच असतात, मात्र डाळीऐवजी चिकनचा समावेश त्यात होतो. बॉयलर चिकनच्या किंमतीत १६ टक्क्यांची घट झाली असल्यामुळे या थाळीच्या दरात घट झाली आहे. मे महिन्यात मांसाहारी थाळीच्या किंमतीतील घसरणीचे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
हीट वेव्हमुळे महागले पदार्थ
उष्णतेच्या लाटेमुळे भाज्या, फळे, डाळींचे दर वाढल्यामुळे जूनमध्ये घाऊक अन्नधान्य महागाई चिंताजनक राहील. मिळालेल्या माहितीनुसार, अन्नधान्य चलनवाढीची दिशा ठरवण्यासाठी हवामान हा महत्त्वाचा घटक आहे. उष्णता वाढल्यामुळे भाज्यांच्या किमती वाढू शकतात आणि महागाईच्या आकड्यावरही परिणाम होऊ शकताे.
पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ
गेल्या १५ दिवसांमध्ये डाळींच्या किमती वाढल्या आहेत. तूरडाळीच्या किमती ४० ते ५० रुपयांनी रुपयांनी आहेत. गेल्या महिन्यात तूरडाळीचा भाव १४० ते १४२ रुपये प्रति किलो होता. हे दर आता वाढले असून डाळ १८० ते १९० प्रतिकिलोने विकली जात आहे, तर हरभरा डाळ ७० ते ७२ रुपये किलोवरून थेट ९० ते ९५ रुपये किलोवर पोहोचली आहे, तर कोथिंबिरीच्या एका जुडीची किंमत ५० ते ६० रुपयांवर आहे. पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community