- ऋजुता लुकतुके
ऑटोमोबाईल क्षेत्रात ‘वर्ल्ड कार ऑफ द ईयर’ हा पुरस्कार मानाचा आहे. यंदा म्हणजे २०२४ ची सर्वोत्तम जागतिक कार ठरली आहे ती कियाची ईव्ही९ (Kia EV9). नावाप्रमाणेच ही पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. महत्त्वाचं म्हणजे तीन रांगांची मोठी एसयुव्ही आहे. त्यामुळे भारतात दाखल होणारी ही पहिली कौंटुंबिक इलेक्ट्रिक एसयुव्ही असेल. ८ जणांची आसन क्षमता आणि तरीही आरामदायी आणि सामान ठेवण्याचीही सोय असलेली ही एसयुव्ही भारतात नक्की चालेल अशी कंपनीला आशा आहे. म्हणूनच या वर्षीच्या शेवटी ती भारतात लाँच करण्याची तयारी कंपनीने चालवली आहे. (Kia EV9)
(हेही वाचा- Lexus UX : मर्सिडिजला टक्कर देणारी लेक्सस कंपनीची ही हायब्रीड एसयुव्ही पाहिलीत का? )
खरंतर इलेक्ट्रिक कार या एअरोडायनॅमिक डिझाईनच्या असतात. म्हणजे पुढे आणि मगे त्यांचा आकार निमुळता होत जातो. पण, ईव्ही९ (Kia EV9) याला पूर्णपणे अपवाद आहे. ती कौंटुंबिक म्हणजे कुटुंबाला सामावून घेणारी बॉक्सी कार आहे. बाहेरून ती एका कलात्मक ठोकळ्यासारखी दिसते. (Kia EV9)
पुढे एलईडी दिव्यांची एक माळ आहे. हे दिवे आडवे आहेत. तर आतून ही गाडी इतर किया गाड्यांसारखीच आहे. चालकाच्या सीटसमोर दोन डिजिटल डिस्प्ले आहेत. यातील इन्फोटेनमेंट स्क्रीन ही जास्त मोठी आहे. यातील साऊंड सिस्टिम तर १४ स्पीकरची आहे. (Kia EV9)
Encore du Kia EV9. pic.twitter.com/BXxNLElzPW
— Le Stagiaire De Hoonited (@LHoonited) June 6, 2024
भारतात य गाडीची कुठली आणि किती व्हर्जन उपलब्ध होणार हे अजून निश्चित नाही. पण, जागतिक स्तरावर ३ प्रकारांमध्ये ईव्ही९ उपलब्ध आहे. ७६.१ किलोवॅट क्षमतेची बॅटरी असलेल्या गाडीत २१४ बीएचपी क्षमतेचं इंजिन आहे. आणि ही गाडी एका चार्जमध्ये ३५८ किलोमीटर धावू शकते. तर ९९.८ किलोवॅट बॅटरी असलेली गाडी ५४१ किमीपर्यंत धावते. (Kia EV9)
(हेही वाचा- Vegetables Price Hike: उन्हामुळे भाज्या महागल्या, जाणून घ्या नवीन दरवाढ)
किया ईव्ही९ भारतात येणार हे कंपनीने आधीच स्पष्ट केलं आहे. आणि भारतीय रस्त्यांवर तिचं टेस्ट ड्रायव्हिंगही सुरू झालं आहे. आणि किंमत म्हणाल तर सुरुवातीची किंमत ८० ते ९० लाख रुपयांच्या घरात असू शकेल. (Kia EV9)
हेही पहा-