NDA Meeting: एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू; काय म्हणाले खासदार?

204
NDA Meeting: एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू; काय म्हणाले खासदार?
NDA Meeting: एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू; काय म्हणाले खासदार?

केंद्रीय सभागृहात NDA ची बैठक (NDA Meeting) सुरु आहे. नरेंद्र मोदी 9 जून रोजी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता हा शपथविधी सोहळा होईल. संसदेत सध्या एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान नरेंद्र मोदी यांची गटनेता म्हणून निवड केली जाणार आहे.संसदेत आल्यानंतर नरेंद्र मोदींनी संविधानाला नमन केलं. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. या बैठकीत फिर एक बार एनडीए सरकार आणि फिर एक बार मोदी सरकार हे नारे देण्यात आले. तिसरी बार मोदी सरकार हा नाराही देण्यात आला. (NDA Meeting)

जे. पी. नड्डा काय म्हणाले?

आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपल्यात उपस्थित आहेत. असं जे. पी. नड्डांनी म्हणताच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदी-मोदी हा गजर झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांपुढे उभं राहात हात जोडले. पुढे नड्डा म्हणाले, “एनडीएतल्या वरिष्ठ नेत्यांचं, मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करतो. तसंच सगळ्या खासदारांचंही मी अभिनंदन करतो. आजचा क्षण हा ऐतिहासिक आहे. आपण या क्षणाची वाट पाहात होतो तोच क्षण आहे. तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार येतं आहे. आपले नेते म्हणून आपण एकमुखाने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची निवड केली आहे.” (NDA Meeting)

“आजचा क्षण खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे. आपण या क्षणाचे साक्षीदार आहोत हे आपलं भाग्य आहे. कोट्यवधी जनतेच्या वतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करतो.” असं जे. पी. नड्डांनी म्हटलं आहे. एनडीएने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे याचा मला आनंद वाटतो, आंध्र प्रदेशात एनडीएचं सरकार आलं आहे. तसंच ओडिशातही आपली सत्ता आली आहे. अरुणाचल प्रदेशात सलग तिसऱ्यांदा आपली सत्ता आली आहे. याचा विशेष आनंद मला वाटतो आहे, असंही नड्डा म्हणाले. (NDA Meeting)

राजनाथ सिंह काय म्हणाले?

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव एनडीएचे आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून मांडला. या नावाला सगळ्यांनीच संबोधन दिलं. मोदी मोदी असा गजर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पुन्हा एकदा पार पडला. तसंच १९६२ नंतर मोदी असे एकमेव नेते आहेत ज्यांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान होता आलं आहे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. देशानेच त्यांना सेवा करण्यासाठी पुन्हा निवडलं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. (NDA Meeting)

अमित शाह काय म्हणाले?

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. ही भारतासाठी एक गौरवाची बाब आहे. १९६२ पासून हे पहिल्यांदा घडलं आहे. राजनाथ सिंह यांनी जे प्रस्ताव ठेवले त्याला पाठिंबा देतो आहे, असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच फिर एक बार मोदी सरकार असंही ते म्हणाले. यानंतर नितीन गडकरींनीही प्रस्तावाला अनुमोदन दिलं. (NDA Meeting)

नितीन गडकरी काय म्हणाले?

“संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपाचे नेते, लोकसभेचे नेते आणि एनडीएचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदींचं नाव प्रस्तावित केलं आहे. या प्रस्तावाला मी मंजुरी देतो आहे. आपला देश महाशक्ती झाला पाहिजे, यासाठी समर्पित भाव मनात ठेवत नरेंद्र मोदी काम करत आहेत. फक्त देशातच तर त्यांच्या नेतृत्वाची भुरळ सगळ्या जगाला पडली आहे. दहा वर्षांत जे काम झालं ती सुरुवात होती. आता येत्या पाच वर्षांत आपण जगातली महान ताकद होऊ, असा मला विश्वास आहे.” असं नितीन गडकरी म्हणाले. (NDA Meeting)

नितीन गडकरींच्या भाषणानंतर कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनीही छोटीशी भाषणं करत नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. तसंच त्यांच्या नावाला अनुमोदन देत प्रस्तावाला मान्यता दिली. (NDA Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.