Ajit Pawar: आम्हीच कुठेतरी कमी पडलो, बारामतीच्या निकालाचे आश्चर्य व्यक्त करत अजित पवार म्हणाले…

लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली.

101
Ajit Pawar: आम्हीच कुठेतरी कमी पडलो, बारामतीच्या निकालाचे आश्चर्य व्यक्त करत अजित पवार म्हणाले..
Ajit Pawar: आम्हीच कुठेतरी कमी पडलो, बारामतीच्या निकालाचे आश्चर्य व्यक्त करत अजित पवार म्हणाले..

बारामती लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर गुरुवारी (ता. 06 जून) पहिल्यांदाच त्यांनी याबाबत स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. हा जनतेने दिलेला कौल आहे. जनतेचा विश्वास संपादित करण्यास मी कमी पडलो हे मान्य करावे लागले, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. तर, बारामती लोकसभेच्या निकालाने आश्चर्य वाटले असून बारामतीकरांनी इतक्या वर्षात त्यांच्यासाठी काम करूनही मला का नाकारले, हे बारामतीकरांशी चर्चा करून जाणून घेईल, असे म्हणत अजित पवारांनी आपले मत व्यक्त केले. (Ajit Pawar)

गुरुवारी (६ जून) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, हा जनतेने दिलेला कौल आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यास कमी पडलो हे मान्य करावे लागेल. या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारत आहे, असे सांगत अजित पवारांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.  (Ajit Pawar)

(हेही वाचा – Parliament News: संसदेत माजी मुख्यमंत्री, सेलिब्रिटी, राजकीय कार्यकर्ता, माजी न्यायमूर्तींसह २८० नवे खासदार कोण ? जाणून घ्या)

तसेच, गुरुवारी, (६ जून) आमदारांना एकत्रित बोलावले होते. यावेळी त्यातील काही त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकले नाही. परंतु जे आले नाही त्यांनी फोनवर संपर्क साधला आणि ते राष्ट्रवादीसोबतच असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. पण मीडियामध्ये विरोधक सांगतात की या आमदाराने, त्या आमदाराने संपर्क साधला, असे काहीही झालेले नाही. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत, हे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे विरोधकांनी काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar)

बारामतीच्या निकालाने चकित…
बारामतीचादेखील जो निकाल लागला आहे त्याबद्दल मी स्वत: आश्चर्य झालेलो आहे. मलाही समजत नाही की, गेल्या अनेक वर्ष मी तिथे काम करत आहे. बारामतीकरांनी मला नेहमी पाठिंबा दिलेला होता. यावेळेस कशामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, बाकीचे मतदारसंघ तर बाजूलाच राहुद्या. पण शेवटी जनतेचा कौल असतो, तो कौल लोकशाहीत स्वीकारायचाच असतो. पुन्हा ना उमेद न होता लोकांसमोर जायचे असते. मी कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की, यश मिळाले म्हणून हुरळून जायचे नसते किंवा अपयश मिळाले म्हणून खचून जायचे नसते. पुन्हा नव्या उमेदीने सगळ्यांनी काही महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमची साहजिकच महायुती आहे, या महायुतीत जे प्रमुख आहेत, त्यांच्याशी चर्चा करून जागावाटप करू. अशी माहिती अजित पवारांनी प्रसार माध्यमांसमोर दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.