- ऋजुता लुकतुके
खेळात जग थांबवण्याची क्षमता आहे. अमेरिका विरुद्ध पाकिस्तान (T20 World Cup, US vs Pak) सामना डॅलस इथं सुरू होता. पण, अर्थातच क्रिकेट फारसं लोकप्रिय नसलं तरी उत्सुकता अमेरिकाभर होती. पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या होत्या. आणि अमेरिकेला बरोबरीसाठी शेवटच्या चेंडूवर चौकार हवा होता. न्यूयॉर्क शहरात टाईम्स स्क्वेअर जवळ वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीवर हा सामना लाईव्ह दाखवला जात होता. शेवटच्या चेंडूसाठी चक्क काही मिनिटांसाठी तिथला सिग्नल थांबवण्यात आला. म्हणजे सगळे स्तब्ध होऊन सामन्याचा शेवटचा चेंडू पाहात होते. (T20 World Cup, US vs Pak)
(हेही वाचा- “टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याच्या आवाज…” Chitra Wagh यांचा काँग्रेसवर निशाणा)
हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर नितिश कुमार (Nitish Kumar) फलंदाजीसाठी तयार होता. अचानक इथले सिग्नल थांबले. तेव्हाचं वातावरण तुम्ही या व्हीडिओत पाहू शकता. (T20 World Cup, US vs Pak)
Signal dropped out for the final ball at the live site! My new mate Michael revealing the news to the 100-odd fans that were off to a super over. Drama. #T20WorldCup https://t.co/dkUeVtmhT7 pic.twitter.com/saimiJYAXf
— Adam Collins (@collinsadam) June 6, 2024
नितिश कुमारने (Nitish Kumar) या चेंडूवर चौकार ठोकला. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. इथं आणखी एक भारतीय वंशाचा खेळाडू सौरभ नेत्रावळकरने (Saurabh Netravalkar) पाकला फक्त १३ धावा दिल्या. अमेरिकेनं १८ धावा केलेल्या असल्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये ५ धावांनी अमेरिकेनं जिंकला. हा विजयही अमेरिकन रस्त्यांवर जल्लोषात साजरा होताना दिसला. (T20 World Cup, US vs Pak)
Cricket in States 🇺🇲🥹.
pic.twitter.com/jwpvbeRdC3— Ragav 𝕏 (@ragav_x) June 6, 2024
टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, US vs Pak) अमेरिकन संघाने पहिला कॅनडा विरुद्धचा सामनाही जिंकला आहे. आता दोन विजयांसह ते ए गटात अव्वल स्थानावर आहेत. विश्वचषकापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही अमेरिकेनं एक सामना जिंकला होता. त्यामुळे आता अमेरिकेनं बांगलादेश आणि पाकिस्तान अशा दोन कसोटी दर्जा असलेल्या संघांना हरवलं आहे. अमेरिकेचा पुढील सामना भारताबरोबर होणार आहे. (T20 World Cup, US vs Pak)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community