T20 World Cup Ind vs Pak : आयसीसीने पाकिस्तान संघाला दुसऱ्या हॉटेलमध्ये का हलवलं?

T20 World Cup Ind vs Pak : पाक संघाची व्यवस्था केलेल्या हॉटेलविषयी पाक बोर्डाने तक्रार केली होती. 

176
T20 World Cup Ind vs Pak : भारत वि. पाक टी-२० सामना मोबाईलवर मोफत कसा पाहायचा?
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) आता सगळ्यांचं लक्ष ९ तारखेला न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने पाकिस्तान संघाचे खेळाडू राहत असलेलं हॉटेल बदललं आहे. पाक बोर्डाने केलेल्या तक्रारीनंतर तातडीने हा बदल करण्यात आला आहे. कारण, पाक संघाला आधीच्या हॉटेलपासून स्टेडिअमपर्यंत पोहोचायला ९० मिनिटं लागत होती. त्यामुळे खेळाडूंना स्टेडिअम जवळच्या हॉटेलमध्ये हलवावं अशी लेखी तक्रार पार बोर्डाने केली होती. (T20 World Cup Ind vs Pak)

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत आयसीसीने खेळाडूंना स्टेडिअमपासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये हलवलं आहे. नसॉ काऊंटी स्टेडिअम लाँग आयलंड, वेस्टबरी इथं आहे. पाकिस्तानचा संघ ९ आणि ११ जूनला आपले पुढील साखळी सामने खेळणार आहे. (T20 World Cup Ind vs Pak)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Pak : या विश्वचषकात रिषभ पंतच तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज )

असा असेल कार्यक्रम 

भारतीय संघ (Indian Team) स्टेडिअमपासून बसने १० मिनिटांत पोहोचता येईल अशा हॉटेलमध्ये राहत आहे. इतर संघांनी मात्र प्रवासाच्या वेळेवरून आयसीसी आणि आयोजकांना सुनावलं आहे. श्रीलंकन संघानेही पहिल्या सामन्यानंतर रहदारी आणि प्रवासाच्या वेळेविषयी तक्रार केली होती. त्यांना तर स्टेडिअमवर पोहोचायला एका तासाहून जास्त वेळ लागत आहे. अमेरिकेतील सामने हे सकाळच्या वेळेत होत आहेत. त्या हिशोबाने हॉटेलमधून खूपच लवकर निघावं लागत असल्याची संघ प्रशासनांची तक्रार आहे. (T20 World Cup Ind vs Pak)

पाक संघ आपला पहिला सामना डॅलसला खेळत आहे आणि तिथून न्यूयॉर्क पर्यंतचा प्रवास केल्यावर पुन्हा स्टेडिअमपर्यंतचा मोठा प्रवास त्यांना करावा लागणार होता. त्यामुळे त्यांनी हॉटेल बदलून घेतलं आहे. टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) २० संघ सहभागी झाले आहेत आणि गटवार साखळी, सुपर ८ गटातील साखळी सामने आणि बाद फेरीचे सामने असा मोठा कार्यक्रम आयसीसीला २ ते २९ जूनपर्यंत पार पाडायचा आहे. या दिवसांत ५५ सामने होणार आहेत. (T20 World Cup Ind vs Pak)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.