T20 World Cup 2024 : खेळपट्टीवर टीका होत असली तरी सामन्याचं ठिकाण न बदलण्यावर आयसीसी ठाम

T20 World Cup 2024 : नसॉ काऊंटी क्रिकेट मैदानातील खेळपट्टी खेळाडूंसाठी सुरक्षित नसल्याचे आरोप होत आहेत. 

167
T20 World Cup 2024 : खेळपट्टीवर टीका होत असली तरी सामन्याचं ठिकाण न बदलण्यावर आयसीसी ठाम
  • ऋजुता लुकतुके

नसॉ काऊंटी क्रिकेट स्टेडिअमवर झालेल्या सामन्यांमध्ये खेळपट्टीवर भरपूर टीका झाली. इथं कृत्रिमपणे बसवलेल्या ४ खेळपट्टींपैकी एकही टी-२० क्रिकेटसाठी साजेशी नाही, असं माजी खेळाडू उघडपणे बोलून दाखवत आहेत. तर खेळाडूंनीही इथल्या अनियमित उसळीवर काळजी व्यक्त केली आहे. पण, आयसीसीने मात्र आता सामन्याचं ठिकाण बदलता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ॲडलेडच्या एका कंपनीने इथं बसवलेल्या खेळपट्ट्या बाहेरून आणलेल्या आहेत. आणि स्पर्धेपूर्वी त्यांची चाचणीही घेण्यात आली नव्हती. गोलंदाजीला धार्जिण्या असलेल्या या खेळपट्ट्यांवर चेंडू अनियमित उसळी आणि स्विंग घेत आहे आणि त्यामुळे फलंदाजांना दुखापतीचा धोकाही निर्माण झाला आहे. (T20 World Cup 2024)

श्रीलंकेचा संघ इथं ७७ धावांत बाद झाला. तर भारतीय संघाने आयर्लंडलाही ९६ धावांत गुंडाळलं. दोनदा आयरिश फलंदाजांना तर भारतीय कर्णधार रोहीत शर्मालाही अचानक उसळलेल्या चेंडूंमुळे किरकोळ का होईना, दुखापत झाली. खेळाडू उघडपणे बोलत नसले तरी खाजगीत या खेळपट्टीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – T20 World Cup Ind vs Pak : आयसीसीने पाकिस्तान संघाला दुसऱ्या हॉटेलमध्ये का हलवलं?)

उर्वरित ६ सामने ठरल्याप्रमाणे होणार

पण, बीसीसीने दिलेल्या एका बातमीनुसार, आयसीसीने खेळपट्टीची दखल घेतली असली तरी सामन्याचं ठिकाण न बदलण्यावर ते ठाम आहेत. खेळपट्टीचं काय करता येईल, यावर आयसीसीमधील तज्ज्ञ लोक विचार करत आहेत. पाणी मारणं, रोलर अशा उपायांवरही काम सुरू आहे. पण, न्यूयॉर्कच्या नसॉ काऊंटी मैदानावर उर्वरित ६ सामने ठरल्याप्रमाणे होणार असं आयसीसीचं म्हणणं आहे. (T20 World Cup 2024)

या टी-२० विश्वचषकासाठी खासकरून न्यूयॉर्कमध्ये नसॉ काऊंटी स्टेडिअम उभारण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचे तज्ज्ञ डॅमियन हॉ यांनी बाहेर ४ खेळपट्ट्या तयार करून त्या इथं आणून बसवल्या आहेत. हॉ या विषयातील तज्ज असून त्यांनी मेलबर्नमध्येही हा प्रकार यशस्वीपणे राबवला आहे. पण, यावेळी सकाळी असलेले सामने आणि खेळपट्टी स्थिरावण्यासाठी न मिळालेला वेळ यामुळे खेळपट्टी खेळण्यायोग्य दिसत नाही. तर आऊटफिल्डही वाळूवर केंटुकी इथून आणलेलं गवत रुजवलं आहे. त्यामुळे इथलं आऊटफिल्डही धिमं असून चौकारांची संख्या कमी झालीय. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.