NDA: पंतप्रधान मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड, बैठकीत म्हणाले…

या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, मला नवीन जबाबदारी दिल्याबद्दल धन्यवाद.

160
NDA Govt : मोदींच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या संसदीय पक्षाची बैठक जुन्या संसदेच्या (संविधान सदन) सेंट्रल सभागृहात झाली. यामध्ये नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला एनडीएच्या १३ घटक पक्षांनी पाठिंबा दिला. (NDA)

या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, मला नवीन जबाबदारी दिल्याबद्दल धन्यवाद. भारत मातेचा आणि देशाचा विकास हे माझे एकच ध्येय आहे. यावेळी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. अमित शहा यांनी या  पाठिंबा दिला आणि नितीन गडकरींनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. जेडीएसचे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. (NDA)

(हेही वाचा – Israel–Hezbollah Conflict : इस्रायलशी थेट युद्ध करण्यास तयार; हिजबुल्लाची धमकी)

यानंतर एनडीएचे महत्त्वाचे घटक असलेले टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले, आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो. मी निवडणूक प्रचारादरम्यान पाहिले आहे की, पंतप्रधानांनी कधीही ३ महिने विश्रांती घेतली नाही. आंध्रमध्ये आम्ही ३ जाहीर सभा आणि १ मोठी रॅली घेतली आणि त्यामुळे निवडणुका जिंकण्यात मोठा फरक पडला.

जेडीयू प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, मी मोदीजींच्या नावाचे समर्थन करतो. त्यांनी आजच शपथ घ्यावी अशी माझी इच्छा होती. १० वर्षे ते पंतप्रधान आहेत. त्यांनी देशाची सेवा केली, जे काही शिल्लक आहे ते आता पूर्ण करू.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक संपल्यानंतर आघाडीचे नेते आजच सरकार स्थापनेचा दावा करतील. ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. मोदींसोबत संपूर्ण मंत्रिमंडळानेही शपथ घेण्याची शक्यता आहे.

एनडीएची पहिली बैठक ५ जून रोजी दुपारी ४ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. १ तास चाललेल्या या बैठकीत १६ पक्षांचे २१ नेते उपस्थित होते. सर्वांनी मोदींना एनडीएचे नेते म्हणून निवडले होते, मात्र शुक्रवारी, (७ जून) होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींची अधिकृतपणे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली.

भाजपाकडे बहुमत नाही, १४ मित्रपक्षांच्या ५३ खासदारांचा पाठिंबा
लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा ही संख्या कमी आहे, मात्र एनडीएने २९३ जागांसह बहुमताचा आकडा पार केला. एनडीएकडे भाजपाशिवाय १४ मित्रपक्षांचे ५३ खासदार आहेत.

त्यांच्याशिवाय भाजपाला सरकार स्थापन करणे अवघड
चंद्राबाबूंचा टीडीपी १६ जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि नितीश कुमार यांचा जेडीयू १२ जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. यावेळी भाजपासाठी दोन्ही पक्ष आवश्यक आहेत. त्यांच्याशिवाय भाजपाला सरकार स्थापन करणे अवघड आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.