Powai Bheemnagar : पवई दगडफेक प्रकरण; ६ महिलांसह ५७ जणांना अटक

180
Powai Bheemnagar : पवई दगडफेक प्रकरण; ६ महिलांसह ५७ जणांना अटक

पवई येथील जयभीम नगर येथे अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी पवई पोलिसांनी ५७ जणांना अटक केली आहे. त्यात ६ महिलांचा समावेश असून अटक करण्यात आलेल्या सर्वांना अंधेरीतील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या दगडफेकीच्या घटनेत १५ पोलीस आणि १२ अतिक्रमण विभागाचे कर्मचारी असे एकूण २७ जण जखमी झाले होते. (Powai Bheemnagar)

पवई येथील जयभीम नगर या ठिकाणी असलेल्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर संतप्त जमावाने तुफान दगडफेक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. या दगडफेकीत साकीनाका विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भरत सूर्यवंशी यांच्यासह पवई पोलिस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार असे १५ जण तर मनपा अतिक्रमण विभागाचे १२ अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण २७ जण जखमी झाले होते. (Powai Bheemnagar)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवईगाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० झोपड्या असलेली ‘लेबर हटमेंट’ तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आली होती. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने मुंबई महानगरपालिका प्रशासनास दिले होते. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार या झोपडपट्टीधारकांना यापूर्वी देखील नोटिस देण्यात आल्या होत्या, असे महापालिका प्रशासनात स्पष्ट केले. (Powai Bheemnagar)

(हेही वाचा – Powai Bheemnagar : पवईत दगडफेकीप्रकरणी २००हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल; २५ जण ताब्यात, पोलिसांसह २५ जण जखमी)

गुरुवारी महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक पोलिस बंदोबस्तसह जयभीम नगर येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आले असता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवाशी जमा झाले, व त्यांनी घोषणाबाजी देऊन मनपाच्या कारवाईला विरोध दर्शविला. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी रहिवाश्यांची समजूत काढत असताना संतप्त झालेल्या जमावातून दगडफेक करण्यात आली, काही क्षणात या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला आणि ४०० ते ५०० जणांच्या जमावाने पोलीस आणि मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दगडांचा वर्षाव सुरू केला. या दगडफेकीत १५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण २७ जण जखमी झाले. (Powai Bheemnagar)

पवई पोलिसांनी या प्रकरणी २०० पेक्षा अधिक जणांविरुद्ध घटनेप्रकरणी पवई पोलिसांनी २०० हुन अधिक जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली बेकायदेशीरपणे एकत्र येणे, दंगल, प्राणघातक हल्ला, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ६ महिलांसह ५७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना अंधेरी न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात येणार आहे. (Powai Bheemnagar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.