Lok Sabha Election 2024: NDA ने राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान

179
Lok Sabha Election 2024: NDA ने राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी राजधानी दिल्लीत संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली आणि त्यात सर्वांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला. राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यावर सर्व दलाच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपासह (BJP) एनडीएच्या (NDA) घटक पक्षांच्या नवनियुक्त खासदारांना संबोधित केले. त्यामुळे देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार बनणार आहे.  (Lok Sabha Election 2024) 

(हेही पाहा – Narendra Modi: केरळमध्ये जम्मू-काश्मीरपेक्षाही जास्त अत्याचार; दाक्षिणात्य कार्यकर्त्यांचं कौतुक करत मोदी म्हणाले…)

दरम्यान, राजधानी दिल्लीत सेंट्रल हॉलमधील कार्यक्रम झाल्यानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनांच्या (Rashtrapati Bhavan) दिशेने गेले. त्याठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची भेट घेत सरकार बनविण्याचा दावा सांगितला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एनडीएचे १५ नेते उपस्थित होते. यावेळी राजनाथ सिंह, अमित शाह, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, प्रफुल पटेल, सुदेश महतो, अनुप्रिया पटेल, एचडी कुमारस्वामी आणि चिराग पासवान यांचा समावेश होता. बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील.  

(हेही वाचा – NDA: पंतप्रधान मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड, बैठकीत म्हणाले…)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले की, आम्ही गुड गवर्नेंसचा नवा अध्याय लिहणार आहोत. विकसित भारताचं स्वप्न साकार करणार आहोत. देशाला फक्त आणि फक्त एनडीएवर भरवसा आहे. देशाचा एनडीएवर विश्वास असल्याने स्वाभाविकपणे त्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. मी आधीही सांगितलं की, मागील १० वर्ष ट्रेलर होता. आता आम्ही आणखी वेगाने देशाचा विकास करू, विरोधकांनी खोटे आणि भ्रम पसरवलं आहेत. असे विधान ही नरेंद्र मोदी यांनी केले. (Lok Sabha Election 2024)   

हेही पाहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.