नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) नियोजनामध्ये सध्या असलेला शाही मार्ग हा बारा मीटर करण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे त्यामुळे या ठिकाणी असलेले जुने वाडे मंदिरे यांचे काय करायचं असा प्रश्न उभा राहिला आहे, यावर महापालिका आयुक्त यांनी फक्त चर्चा झाली आहे निर्णय झालेला नाही असे स्पष्ट केले आहे. आयुक्त. डॉ. विजय करंजकर, अतिरिक्त आयुक्त चौधरी शहर अभियंता अग्रवाल आणि इतर विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांनी सिंहस्थ कामांमध्ये कोण कोणती कामे प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहे आणि कोणती कामे हाती घेणे अतिआवश्यक आहे यादृष्टीने पाहणी केली. (Kumbh Mela)
नाशिक मनपाने तयार केलेल्या सिंहस्थ कृती आराखड्याच्या कामांचे अनुषंगाने आयुक्तांनी संयुक्त पाहणीस रामकुंड पासून सुरुवात केली. एकमुखी दत्तमंदिर जवळ होळकर पुलाच्या डाव्या बाजुच्या पायऱ्याच्या अनुषंगाने तशाच पंचवटीच्या बाजुने पायऱ्या करता येतील का तसेच गांधी ज्योत नुतनीकरण, गांधी तलाव परिसरात पाणी भरल्यानंतर अल्हाददायक वातावरण राहील यादृष्टीने नाविन्यपूर्ण उपाययोजना करणेच्या अनुषंगाने सुचना दिल्या. रामकुंड व लक्ष्मणकुंड येथील सांडवा आणि इतर सांडवे यांची आगामी सिंहस्थाच्यादृष्टीने स्ट्रक्चरल स्टॅबिलिटची तपासून मजबुतीकरण करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करणे बाबत सुचना दिल्या. नदीकाठावरील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, नुतनीकरण करण्याच्या सुचना दिल्या. गोदावरी नदीवरील देवी मंदिरासमोरील मनपा मालकीची इमारत आगामी सिंहस्थाच्यादृष्टीने उपायोगात आणता येईल का याबाबच सुचना दिल्या. (Kumbh Mela)
(हेही वाचा – NDA च्या बैठकीत Narendra Modi यांनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले…)
आगामी सिंहस्थ शाही मिरवणुका व रामरथ, गरुडरथ, गाडगे महाराज पुलाखालून येतांना पुलाच्या उंचीमुळे मिरवणुकीस मर्यादा येतात. त्यामुळे पुलाखाली खड्डा ठेवावा लागतो. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे पुलाचे मजबुतीकरण व नुतनीकरण, पुलावरून एक रॅम्प उतरवता येऊ शकेल काय याबाबत सुचना दिल्या. नदीपात्रात होणारी पार्किंग तसेच सिंहस्थ कालावधीत होणारी संभाव्य वाहनांची गर्दी लक्षात घेता गणेशवाडी येथे अमरधाम समोरील पार्किंगसाठी आरक्षित असलेली जागा मनपाच्या ताब्यात घेण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करण्यास सांगितले. (Kumbh Mela)
पारंपारिक शाहीमार्गाची पाहणी करून २००३ साली झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणांची पाहणी करून सन २०१७ च्या मंजुर आराखड्यामध्ये प्रस्तावित असलेल्या विकास योजना रस्त्याचा विकास करण्यासाठी संपादित करावयाच्या मिळकतींची माहिती तयार करण्याच्या सुचना दिल्या. नाशिक शहरासाठी काळाराम मंदिराचे पौराणिक महत्त्व लक्षात घेता तसेच साधुमहंत यांचा काळाराम मंदिराशी असलेला जिव्हाळा लक्षात घेता मंदिराच्या सभोवताली कायमस्वरुपी चांगल्या प्रकारचे विकसन होणेसाठी अभ्यास करणे बाबत सुचना दिल्या. (Kumbh Mela)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community