State Excise Department ची कारवाई; २१.८८ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

209
State Excise Department ची कारवाई; २१.८८ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अंजूरगाव खाडी, कालवारगाव, छोटी देसाई मोठी देसाई खाडी, अलिमघर, दिवा खाडी, माणेरेगाव या ठिकाणी हातभट्टी केंद्रावर शुक्रवारी (७ जून) छापे टाकले. या मोहिमेतील कारवाईमध्ये १२ गुन्हे नोंदविले असून यामध्ये एकूण २१ लाख ८८ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (State Excise Department)

या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये ५५ हजार २०० लिटर रसायन, ३५ लिटर गावठी दारू, दोन डिझेल इंजिन व इतर हातभट्टी साहित्याचा समावेश आहे. नाशवंत मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आला, तर दोन डिझेल इंजिन जप्त करण्यात आले आहेत. (State Excise Department)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: केंद्रात राज्याला मोठा वाटा मिळण्याची शक्यता; दिल्लीत शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू)

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, ठाणे व डोंबिवली विभागातील निरिक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली आहे, असे कोकण उपायुक्त पवार यांनी कळविले आहे. (State Excise Department)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.