पंतप्रधान Narendra Modi यांनी केला सरकार स्थापनेचा दावा; 9 जूनला होणार शपथविधी

Narendra Modi यांची भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्याचे पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आले. एनडीएच्या घटक पक्षांची पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना देण्यात आली.

178
पंतप्रधान Narendra Modi यांनी केला सरकार स्थापनेचा दावा; 9 जूनला होणार शपथविधी
पंतप्रधान Narendra Modi यांनी केला सरकार स्थापनेचा दावा; 9 जूनला होणार शपथविधी

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेतेपदी निवड करण्यासाठी एन.डी.ए.च्या नवनिर्वाचित खासदारांची ७ जून रोजी बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजप नेत्यांबरोबरच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनीही आपल्या भाषणांद्वारे नव्या सरकारबाबत अनेक संकेत दिले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची भेट घेतली.

(हेही वाचा – Sanjay Raut : ‘महाविकास आघाडीत मोठा भाऊ कुणी नाही, उबाठाच महत्त्वाचा पक्ष’)

या वेळी नरेंद्र मोदी यांची भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्याचे पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आले. एनडीएच्या घटक पक्षांची पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना रविवारी शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ९ जूनला त्यांचा शपथविधी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हहा शपथविधी होऊ शकतो. पंतप्रधान पदासाठी तिसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “एनडीएची बैठक झाली होती. एनडीएच्या सर्व मित्रांनी मला पुन्हा एकदा या दायित्वासाठी पसंती दिली आहे. एनडीएच्या घटकपक्षांनी याबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली. त्यानुसार राष्ट्रपतींनी मला आता बोलावलं होतं. मला पंतप्रधान पदाच्या रूपाने नियुक्ती दिली आहे. मला शपथविधीसाठी आणि मंत्रिपदाच्या यादीसाठी त्यांनी सूचित केलं आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.