BMC School मधील मुलांचे यंदाही रडगाणे, गणवेशासह शालेय वस्तू मिळणार उशिराने

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, स्टेशनरी तसेच छत्र्या व रेनकोट आदी शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा सन २००७ पासून करण्यात येत आहे.

671
BMC School मधील मुलांचे यंदाही रडगाणे, गणवेशासह शालेय वस्तू मिळणार उशिराने
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेच्या शाळा (BMC School) आता पुढील आठवड्यात सुरु होणार असून अद्यापही विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वस्तूंची खरेदीची प्रक्रियाच सुरु झालेली नाही. महापालिकेच्यावतीने सन २०२४ ते सन २०२५ या दोन शैक्षणिक वर्षांकरता या शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येत असून या खरेदीसाठी जून महिन्याच्या सुरुवातीला कार्यादेश देण्यात आल्याने पुढील दोन महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास महापालिकेच्या शाळांमधील मुलांना ऑगस्टपर्यंत या वस्तू मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी अशाप्रकारे खरेदीला विलंब होत असल्याने याची निविदा प्रक्रिया डिसेंबर, जानेवारीपर्यंत करून शाळेच्या पहिल्या दिवशीच या वस्तू देण्याचा निर्धार करणाऱ्या प्रशासनाकडून यंदाही तसाच विलंब झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभार हा ये रे माझ्या मागल्या असाच असल्याचे कारभार असल्याचे दिसून येत आहे. (BMC School)

मुंबई महापालिकेच्या शाळेतील (BMC School) विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, स्टेशनरी तसेच छत्र्या व रेनकोट आदी शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा सन २००७ पासून करण्यात येत आहे. मात्र, यातील एक ते दोन वर्षे वगळता इतर सर्व शैक्षणिक वर्षांत शाळा सुरु झाल्यानंतर काही महिन्यांनी या वस्तूंचे वाटप होत आलेले आहे. त्यामुळे सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या दोन शैक्षणिक वर्षांकरता या सर्व शैक्षणिक वर्षांकरता खरेदीची प्रक्रिया सुरु केली असून त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी कंत्राटदारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून याबाबतचे कार्यादेश जून् महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दिल्याने प्रत्यक्षात या वस्तू विद्यार्थ्यांना मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC School)

(हेही वाचा – Sanjay Raut : ‘महाविकास आघाडीत मोठा भाऊ कुणी नाही, उबाठाच महत्त्वाचा पक्ष’)

मागील वर्षी मुलांना शाळा सुरु झाल्यानंतरही शालेय वस्तूंचे वाटप न झाल्याने तत्कालिन आश्विनी भिडे आणि तत्कालिन सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांनी सर्व कंत्राटदारांना दम भरत या वस्तू नियोजित वेळेत देण्यास भाग पाडले होते. त्यानंतर सहआयुक्त अजित कुंभार यांनी शाळेच्या पहिल्या दिवशीच मुलांच्या हाती या वस्तू पडाव्यात यासाठीची निविदा प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापासून राबवून जानेवारीपर्यंत कार्यादेश देत शाळा संपण्यापूर्वीच सर्व साहित्य शाळांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल आणि या साहित्याचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना केले जाईल अशाप्रकारची ही संकल्पना होती. परंतु कुंभार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डि गंगाथरन यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी शालेय वस्तुंच्या खेरदीला एवढी घाई करण्याची गरज नाही असाच पावित्रा घेतली. (BMC School)

महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार ४ जुलै २३ पर्यंत या शालेय वस्तुंच्या खरेदीसाठी निविदा मागवण्यासाठी वर्तमान पत्रामध्ये जाहिरात प्रकाशित झाली. परंतु त्या विभागाने तिथे दुर्लक्ष केला. त्यानंतर या शालेय वस्तूंच्या पुरवठ्याबाबत १९ ऑक्टोबर २०२३मध्ये महापालिका मुख्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली होती. परंतु निविदेची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात पार पडूनही प्रत्यक्षात ही निविदा वेळेत राबवली गेली नाही आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निविदा अंतिम झाल्यानंतर याच्या प्रस्तावाला प्रशासकांनी मान्यता दिली. त्यामुळे जुनच्या पहिल्या आठवड्यात या वस्तूंच्या खरेदीसाठी कार्यादेश दिल्याने प्रत्यक्षात याही वर्षी मुलांच्या हाती दप्तरांसह इतर वस्तू या उशिराने पडणार असून त्यामुळे मुलांना या वस्तूंसाठी किमान दोन महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (BMC School)

विद्यार्थ्यांची संख्या
  • इयत्ता पूर्व प्राथमिक ते इयत्ता २ री : २, ५१, ५१६
  • इयत्ता ३ री ते ७ वी : ३, ८२, ३८६
  • इयत्ता ८ वी १० वी : १, ६६, ६३८

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.