पवई तलावातील जल प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने बनवण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार आतापर्यत या तलावातील जाणाऱ्या सांडपाणी रोखण्यात यश येत आहे. या तलावांमध्ये सांडपाणी प्रवेशाचे मार्ग सुमारे १५ होते, त्यापैकी आतापर्यंत केवळ ४ ते ५ शिल्लक राहिले असून उर्वरीत सर्व प्रवेश मार्ग बंद करून मलवाहिन्यांमध्ये वळवण्यात यश आले आहे. (Powai Lake)
पवई तलावातील प्रदूषण रोखून, या तलाव परिसराचा नैसर्गिक समृद्ध विकास करण्यासाठी तसेच त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. पवई तलावातील प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढून त्याला नैसर्गिक समृद्धी प्रदान करण्यासाठी सर्वप्रथम तलावामध्ये येणाऱ्या सांडपाण्याला अटकाव करुन ते येण्यापासून रोखणे, तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी तरंगती वायुवीजन व्यवस्था याबाबतची कामे टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे आतापर्यंत यामध्ये येणाऱ्या सांडपाण्याचा प्रवाह रोखण्यात येत असून तलावातील सांडपाणी प्रवेशाच्या अंदाजित १५ जागा असून त्यापैकी ४-५ भाग प्रवेशमार्ग सक्रिय आहेत. पवई तलावात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी, पाण्याच्या गुणवत्तेची देखभाल आणि जैवविविधता पुन्हा स्थापित करण्यासाठी खात्याद्वारे हे प्रवाह जवळच्या सांडपाणी वाहिन्यांवर वळवले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Powai Lake)
‘या’ कामांसाठी कंत्राटदारांची नेमणूक
पवई तलावात सात तरंगणारे वायुवाहक कारंजे बसवले जात आहेत. याद्वारे तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. ही उपकरणे जलजीवनासाठी आवश्यक असलेली संतुलित प्राणवायूची पातळी राखण्यासाठी पाण्यात प्राणवायूचा पुरवठा वाढवण्याचे काम केले जाते. याद्वारे शेवाळांची वाढ रोखणे, दुर्गंधी दूर करणे, माशांचा अधिवास वाढविणे, डासांच्या जागा कमी करणे आणि तळाशी साठणारा गाळ कमी होण्यास मदत होईल. (Powai Lake)
पवईतील पवई तलाव हा सन १८९१ मध्ये बांधण्यात आलेला मानव निर्मित तलाव आहे. जवळपास २ चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या पवई तलावाची जमीन ही मूळची शेत जमीन होती. कावसजी फ्रामजी यांच्या मालकीची ही जमीन संपादीत केल्यानंतर सुमारे १० मीटर उंचीचा दगडी बांध घालून हा तलाव बांधण्यात आला. सुमारे १० मीटरपर्यंत खोली असलेल्या या तलावाच्या सर्व बाजूंनी रहिवास क्षेत्र विकसित झाले आहे. तत्पूर्वी सन १८९३ मध्येच या तलावाचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे निश्चित करण्यात आले. सांडपाण्याच्या प्रवाहामुळे हे पाणी प्रदूषित होऊन या तलावात गाळ साचण्यासह जलपर्णींची अनावश्यक वाढ ही देखील समस्या निर्माण झाली. प्रदूषणाची समस्या रोखून तलावाचे पाणी शुद्ध राखणे, तलावाची नैसर्गिक स्थिती आणि त्यातील जैवसमृद्धी टिकविण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून सल्लागाराची नेमणूक करून या कामांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आले आहे. त्यानुसार ही कामे सध्या सुरु आहेत. (Powai Lake)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community