Devendra Fadnavis यांचा राजीनामा स्वीकारण्यास अमित शहांचा नकार, कारण काय ? वाचा सविस्तर

एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत आहेत.

351
Devendra Fadnavis यांचा राजीनामा स्वीकारण्यास अमित शहांचा नकार, कारण काय ? वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी मागणी भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी केली आहे. तरी देखील देवेंद्र फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची माझी इच्छा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीमान्यानंतर राज्यातील उपमुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांच्या गळ्यात पडण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. (Devendra Fadnavis )

एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत आहेत. दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार आणि केंद्रातील मंत्रिपदाबाबत चर्चा करण्यासाठी या तिन्ही नेत्यांची बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे, मात्र या सर्वाबाबत केंद्रीय नेतृत्त्वाने कोणताही निर्णय घेतला नसल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. (Devendra Fadnavis )

(हेही वाचा – Modi 3.o : दिल्ली नो फ्लाय झोन घोषित; कलम १४४ लागू)

गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यात फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणारे गिरीश महाजन यांचे नाव सध्या चर्चेत आहे. सर्वांशी समन्वय साधणारा नेता म्हणून गिरीश महाजन यांची ओळख आहे तसेच महायुतीमधील इतर पक्षांतील नेत्यांशीदेखील त्यांचे चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दोन नंबरचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रदेश भाजपाच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक
महाराष्ट्रातील भाजपा चे सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्यांची एक महत्त्वाची तातडीची बैठक शनिवार, 8 जून रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.