Matheran Mini Train : माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर; पर्यटकांसाठी पर्याय कोणते?

204
Matheran Mini Train : माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर; पर्यटकांसाठी पर्याय कोणते?
Matheran Mini Train : माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर; पर्यटकांसाठी पर्याय कोणते?

माथेरानची (Matheran) राणी अशी ओळख असलेली, नेरळ – माथेरानदरम्यान धावणारी मिनी ट्रेन (Matheran Mini Train) पर्यटकांचे खास आकर्षण आहे. पावसाळ्यात येथील निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र, पावसाळ्यात नेरळ – माथेरान नॅरो गेज मार्गावरील नेरळ – अमन लॉज विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा ८ जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी केवळ माथेरान – अमन लॉजदरम्यानची शटल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. (Matheran Mini Train)

(हेही वाचा –Modi 3.o : दिल्ली नो फ्लाय झोन घोषित; कलम १४४ लागू)

नेरळ ते माथेरान मिनीट्रेन (Matheran Mini Train) मार्ग डोंगरातून जातो. मुसळधार पावसात हा मार्ग धोकादायक ठरतो. प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ ते अमन लॉज (Aman Lodge) रेल्वेमार्ग दरवर्षी बंद करण्यात येतो. पावसाळ्यात माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठी असल्याने पर्यटकांच्या सुविधेसाठी अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. (Matheran Mini Train)

(हेही वाचा –Tree Plantation : नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर घालणाऱ्या ५ हजारांहून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड)

सोमवारी – शुक्रवारदरम्यान विशेष गाडी अमन लॉज येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल आणि माथेरान येथे सकाळी १०.४४ वाजता पोहचेल. तसेच माथेरान येथून दुपारी १२.२५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे दुपारी १२.४३ वाजता पोहचेल. सर्व शटल सेवा तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी डब्बा आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील. (Matheran Mini Train)

माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)

माथेरान येथून रोज सकाळी ८.२०, सकाळी ९.१०, सकाळी ११.३५, दुपारी २, दुपारी ३.१५, सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज येथे अनुक्रमे सकाळी ८.३८, सकाळी ९.२८, सकाळी ११.५३, दुपारी २.१८, दुपारी ३.३३, सायंकाळी ५.३८ वाजता पोहचेल. (Matheran Mini Train)

अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)

अमन लॉज येथून रोज सकाळी ८.४५, सकाळी ९.४५, दुपारी १२, दुपारी २.२५, दुपारी ३.४०, सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी ९.०३, सकाळी ९.५३, दुपारी १२.१८, दुपारी २.४३, दुपारी ३.५८, सायंकाळी ६.०३ वाजता पोहचेल.

शनिवार – रविवारी विशेष गाडी माथेरान सकाळी १०.०५, दुपारी १.१० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज येथे सकाळी १०.२३ दुपारी १.२८ वाजता पोहचेल. तसेच अमन लॉज येथून विशेष गाडी सकाळी १०.३०, दुपारी १.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी १०.४८, दुपारी १.५३ वाजता पोहचेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.