लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडीने यश मिळवताना तब्बल 30 जागा जिंकल्या आहेत. नेमका आता हाच धागा पकडत कोल्हापूरमध्ये (Kolhapur) लागलेल्या बॅनर्सची सुद्धा चांगली चर्चा रंगली आहे. कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी (Sharad Pawar) मारलंय कुठं असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमधील चांगलाच चर्चेला विषय झाला आहे.
स्टँड परिसरातील लावलेला हा बॅनर युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती असल्याने हे नेते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठिशी होते. मात्र, संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. (Sharad Pawar)
(हेही वाचा –Matheran Mini Train : माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर; पर्यटकांसाठी पर्याय कोणते?)
लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटातील काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मार्गावर असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community