vivo X Fold3 Pro : विवो कंपनीचा हा नवीन फोन आहे आयफोन पेक्षाही महाग

vivo X Fold3 Pro : विवोने फोल्डेबल फोनमधील नवीन श्रेणी बाजारात आणली आहे

154
vivo X Fold3 Pro : विवो कंपनीचा हा नवीन फोन आहे आयफोन पेक्षाही महाग
vivo X Fold3 Pro : विवो कंपनीचा हा नवीन फोन आहे आयफोन पेक्षाही महाग
  • ऋजुता लुकतुके

विवो कंपनीने (vivo X Fold3 Pro) अखेर आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. सध्या मोबाईल फोन बाजारपेठेत फोल्डेबल फोनची चलती आहे. ॲपलपासून सगळ्याच कंपन्या असे फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे ते परवडण्यायोग्य किमतीत असावेत असाही कंपन्यांचा प्रयत्न आहे. अर्थात, सध्याचा विवोचा फोन मात्र आयफोनपेक्षाही महाग आहे. फोल्डेबल फोनच्या बाजारपेठेत कंपनी उशिरा उतरली असली तरी त्यांनी आणलेला पहिला फोन वजनाने हलका आणि वापरायला जास्त सोपा आहे. त्यामुळे फोल्डेबल फोनच्या बाजारपेठेत मोठा बदल घडवणारा हा फोन असेल. विवो एक्सफोल्ड ३ प्रो (vivo X Fold3 Pro) हा मजबूत फोन असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कारण, फोल्डेबल फोनची स्क्रीन एरवी लवकर खराब होण्याची शक्यता असते.  (vivo X Fold3 Pro)

(हेही वाचा- NEET – UG Exam: नीट निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह आयएमएने केली ‘ही’ मागणी)

या फोनला ६.५३ इंचांची अतिशय सुस्पष्ट दिसणारी २के दर्जाची स्क्रीन आहे. हे या फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. फोनचा ब्राईटनेसही ५,४०० बिट्सचा आहे. तर फोनचा अल्ट्रासॉनिक फिंगर प्रिंट सेंसरही फोन हाताळण्याचा चांगला अनुभव देतो. हात ओले असतानाही हा सेन्सर सांगितलेलं काम पूर्ण करू शकतो. (vivo X Fold3 Pro)

 फोल्डेबल फोन असल्यामुळे फोनमध्ये संगणकाप्रमाणे एकाचवेळी दोन किंवा तीन ॲप वापरणं अगदी सोपं आहे. फोनचा इंटरफेसही तसा परिणामकारक आहे. फोल्डेबल फोनची उपयुक्तता वाढवण्यासाठी इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब यासारखी अनेक ॲप या फोनमध्ये नीट बसतील याची काळजी घेण्यात आली आहे. फोनमधील प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८ चा तिसऱ्या पिढीतील अद्ययावत प्रोसेसर आहे. गेमिंगचा या फोनमधील अनुभवही चांगला आहे.  (vivo X Fold3 Pro)

(हेही वाचा- Sharad Pawar : कोल्हापुरी बॅनर्सची रंगली चर्चा! सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं)

फोनची बॅटरी ५,७०० एमएएच क्षमतेची आहे. सोबत १०० किलोवॅटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. या चार्जरमुळे बॅटरी ५ टक्क्यांवरून १०० टक्क्यांवर ३७ मिनिटांत जाऊ शकते. तर एकदा संपूर्ण चार्ज झालेली बॅटरी इन्फोटेनमेंट कार्यक्रम पाहिल्यानंतरही १० ते १३ तास चालू शकते. विवोचा कॅमेराही चांगला आहे. यात झाईस ३ ही लेन्स देण्यात आली आहे. तर ३ एक्स ऑप्टिकल झूमलेन्सही यात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फोनची किंमत १,५९,००० रुपयांपासून सुरू होते. (vivo X Fold3 Pro)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.