Most Sixes In International Cricket : ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम 

Most Sixes In International Cricket: आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात रोहीत शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६०० वा षटकार ठोकला आहे 

139
Ind vs SL, ODI Series : टी-२० प्रभावामुळे भारतीय संघ हरला का? प्रश्नावर रोहितचं बाणेदार उत्तर
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्माला हिटमॅन हे टोपणनाव पडलं ते त्याच्या मनाप्रमाणे षटकार ठोकता येण्याच्या सवयीमुळेच. टायमिंगचं नैसर्गिक वरदान त्याला लाभलंय. त्याच्या जोरावर फारशी ताकद न लावता तो षटकार मात्र लीलया मारतो. खासकरून हूक आणि पूलच्या फटक्यांवर त्याने वसूल केलेल्या षटकारांसाठी तो जास्त लोकप्रिय आहे. बुधवारी आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याची हुकुमत मैदानावर दिसली. गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्याने ३५ चेंडूंत नाबाद ५२ धावा तर केल्याच. पण, त्याचबरोबर सामन्यात ३ षटकार ठोकून एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. ३५ वर्षीय रोहित आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा आणि ६०० षटकारांचा टप्पा पार केलेला फलंदाज ठरला आहे. सध्या सक्रिय असलेल्या फलंदाजांनी त्याच्या निम्मे षटकारही ठोकले नाहीएत. यातून त्याचं वर्चस्व दिसून येतं. षटकारांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेललाही त्याने डिसेंबर २०२३ मध्येच मागे टाकलं आहे.  (Most Sixes In International Cricket)

(हेही वाचा- Sharad Pawar : कोल्हापुरी बॅनर्सची रंगली चर्चा! सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं

रोहित शर्माच्या विक्रमाच्या निमित्ताने सगळ्यात जास्त षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीवर एक नजर टाकूया,  (Most Sixes In International Cricket)

क्रमांक

खेळाडू

षटकार

देश

सामने

कसोटीतील षटकार

एकदिवसीय सामन्यातील षटकार

टी-२० तील षटकार

रोहित शर्मा

६००*

भारत

४७३

८४

३२३

१९३

ख्रिस गेल

५५३

वेस्ट इंडिज

४८३

९८

३३१

१२४

शाहीद आफ्रिदी

४७६

पाकिस्तान

५२४

५२

३५१

७३

ब्रँडम मॅक्युलम

३९८

न्यूझीलंड

४३२

१०७

२००

९१

मार्टिन गपटिल

३८३

न्यूझीलंड

३६७

२३

१८७

१७३

महेंद्रसिंग धोनी

३५९

भारत

५३८

७८

२२९

५२

सनथ जयसूर्या

३५२

श्रीलंका

५८६

५९

२७०

२३

भारतात रोहित शर्माच्या खालोखाल महेंद्रसिंग धोनी (३५९) आणि विराट कोहली (२९४) इतके षटकार ठोकले आहेत. तर सध्या सक्रिय असलेल्या क्रिकेटपटूंमध्येही रोहित शर्मा इतरांपेक्षा या बाबतीत वरचढ आहे. इंग्लंडच्या जोस बटलरच्या नावावर ३३२ आंतरराष्ट्रीय षटकार आहेत. तर डेव्हिड वॉर्नर ३१२ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वॉर्नर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तर चौथ्या स्थानावर भारताचा विराट कोहली आहे. ग्लेन मॅक्सवेल २८४ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे. (Most Sixes In International Cricket)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.