मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी (Mega Block) आहे. रविवारी (9 जून) मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी-वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. (Mega Block)
पश्चिम रेल्वे
कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहील. याशिवाय काही लोकल सेवा दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. (Mega Block)
हार्बर रेल्वे
कुठे: सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे, तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवाही बंद राहील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. (Mega Block)
मध्य रेल्वे
कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर मार्गावर वळवण्यात येणार आहेत. घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील. (Mega Block)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community