- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) अमेरिकेतील साखळी सामन्यांतील सुविधा आणि सोयींवर श्रीलंकन संघ नाराज आहे. त्यांनी लंकन बोर्डाने तर खेळाडूंना दुजाभावाने वागणूक मिळत असल्याची तक्रार आयसीसीकडे केली आहे. फ्लोरिडा राज्यात खेळाडू ७ तास अडकून पडल्यानंतर संघ प्रशासनाचा पाराही चढला. त्यांची बाजू देशाचे क्रीडामंत्री हरिन फर्नांडो (Harin Fernando) यांनी उचलून धरली आहे. न्यूयॉर्कसा संघ पोहोचला तर त्यांचं हॉटेल सरावाच्या मैदानापासून ९० मिनिटं दूर होतं. तर भारताचं हॉटेल मैदाना जवळच होतं. हे पाहूनही लंकन प्रशासनाचा राग अनावर झाला आहे. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Narendra Modi: पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण आशियातील ‘या’ पहिल्या महिलेला, कोण आहेत त्या? जाणून घ्या)
सगळ्या गैरसोयींचा सामना करत लंकन संघ साखळीतील आपला पहिला सामना खेळला. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्घ त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर हरिन यांनी हा मुद्दा लंकन संसदेतही मांडला. ‘वेगवेगळ्या देशाच्या खेळाडूंना वेगवेगळी वागणूक मिळत आहे. आम्ही याविषयी आयसीसीकडे लेखी तक्रार केली आहे. आयोजक अमेरिकन क्रिकेट संघटनेनं आम्हाला चांगला वागणूक दिलेली नाही,’ असं फर्नांडो (Harin Fernando) लंकन संसदेत बोलताना म्हणाले. (T20 World Cup 2024)
A tough start to the #T20WorldCup as we fall to South Africa in the opener. We’ll regroup, refocus, and come back stronger!#LankanLions #SLvSA pic.twitter.com/NgbCCxk5Mj
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 3, 2024
लंकन क्रीडा मंत्रालयाने एक अधिकारी अमेरिकेत पाठवला आहे. लंकन खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांची परिस्थिती याचा आढावा हा अधिकारी घेईल. क्रीडामंत्री फर्नांडो यांनी हा ठराव मांडल्यानंतर लंकन विरोधी पक्षांनीही तो उचलून धरला. लंकन क्रिकेट संघ हा राष्ट्रीय वैभव आहे. त्यांना बाहेर देशात चांगली वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करेल, असा सूर लंकन संसदेतही दिसला. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Modi 3.0 : मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत कशी असणार सुरक्षा व्यवस्था?)
यापूर्वी पाकिस्तान संघानेही त्यांना नसॉ काऊंटी स्टेडिअमपासून (Nassau County Stadium) दूर हॉटेल मिळाल्याची तक्रार यजमान अमेरिका आणि आयसीसीकडे (ICC) केली होती. त्यानंतर त्यांचं हॉटेल आयसीसीने हस्तक्षेप करून बदललं होतं. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community