घाटकोपर ते वर्सोवा या मुंबईतील पहिल्या मुंबई वन मेट्रो ( Mumbai Metro One) मार्गिकेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई मेट्रो वनने आपल्या सेवेची १० वर्षे पूर्ण केली आहेत. या संपूर्ण वर्षांच्या कालावधीत ९७० दशलक्ष प्रवासी ( ९७ कोटी ) प्रवाशांची वाहतूक मुंबई मेट्रो वनने केली आहे. मुंबई मेट्रो वन हा पहिला खासगी आणि सार्वजनिक सहभागातून तयार केलेला पीपीपी प्रकल्प आहे. या मार्गिकेला बांधण्यासाठी ४,३२१ कोटी रुपये खर्च आला आहे. (Mumbai Metro One)
एकूण ११.४० किमीचा आणि १२ स्थानके असलेला हा मार्ग पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडतो. त्यामुळे या मार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा बांधण्यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीची एमएमआरडीएने मदत घेतली होती. या प्रकल्पात रिलायन्सचे ६९ टक्के शेअर आहेत. तर एमएमआरडीचे २६ टक्के आणि ५ टक्के शेअर वेओलिया ट्रान्सपोर्टचे आहेत. मुंबई मेट्रो वन ८ जून २०१४ रोजी सुरू झाली होती. मुंबई मेट्रो वन मार्गिकेने सध्या दिवसाला ४१८ फेऱ्यांद्वारे दररोज ४.५ लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. मुंबई मेट्रो वनने १० वर्षात १२.६ कोटी किमीचे रनिंग पूर्ण करीत विक्रम केला आहे. (Mumbai Metro One)
(हेही वाचा – Narendra Modi Oath Ceremony: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे दिल्लीत आगमन)
डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी
१० वर्षांत मुंबई मेट्रो वनने आपल्या ताफ्यातील १६ ट्रेनद्वारे ९७ कोटी प्रवाशांची वाहतूक तर केली आहे. शिवाय मुंबईच्या या पहिल्या मेट्रोने १२.६ कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. म्हणजे एका ट्रेनने सरासरी ९.७ किमीचा प्रवास केला आहे. घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या या मुंबई मेट्रो वनच्या ट्रेनला केवळ चारच डबे आहेत. गर्दी वाढल्याने हे डबे अपुरे पडत आहेत. त्यामुळे या ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवावी तसेच सुटीच्या दिवशी फेऱ्या वाढवाव्यात आणि २ ट्रेनमधील वेळ कमी करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. (Mumbai Metro One)
मेट्रो मार्ग २ अ आणि मेट्रो -७ प्रवासी संख्येत वाढ
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पालघर यार्डात मालगाडी घसरल्याचा अपघात झाला तेव्हा नवीन मेट्रो मार्ग २ अ आणि मेट्रो -७ च्या बोरीवली, कुरार आणि राष्ट्रीय उद्यान या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती, त्यावेळी एमएमआरडीएच्या महा मुंबई मेट्रोने अतिरिक्त मेट्रो ट्रेन चालवून प्रवाशांना दिलासा दिला होता. मुंबई मेट्रो लाईन २A आणि ७ने देखील नुकताच एकाच दिवसात सर्वाधिक २,६०,४७१ प्रवासी संख्येचा टप्पा गाठला असल्याची माहिती ट्विटरद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
ट्रेनची फ्रीक्वेन्सी वाढवावी
सध्या मुंबई मेट्रो वन मार्गिकेवर दररोज सोमवार ते शुक्रवार या दिवशी ४१८ मेट्रो फेऱ्या चालविल्या जात असून पिकअवरला दर ३.५ मिनिटाला तर नॉन पिकअवराला दर ७ मिनिटांना एक ट्रेन चालविला जात आहे. परंतु नॉन पिक अवरला कधी कधी १० मिनिटांनी एक ट्रेन सुटते त्यामुळे स्टेशनवर रांगा लावाव्या लागतात. ट्रेन लगेच सुटते त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो असे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community