मला सरकाराच्या कामातून मोकळे करा, हे आपण निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटले असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात स्टॅटेजी होती. मी अमित शाह यांना भेटून आलो, त्यांना काय डोक्यात आहे ते सांगितले. तेव्हा आता विधानसभेतसाठी पुन्हा नव्याने पेरणी करणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळवता आले नाही, यामागील कारणमीमांसा करण्यासाठी महाराष्ट्र भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली, त्या बैठकीत फडवणीस बोलत होते.
अमित शहा यांनी मला सांगितले, आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करु. मी एक मिनीट देखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाही. कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणण्याचे रेकॉर्ड यापूर्वी केवळ नेहरुंच्या नावावर आहे. त्यांची बरोबरी आता नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लोकांनी मोदीजी आणि एनडीएवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. आपल्याला रणनिती ठरवण्यासाठी आजची बैठक महत्वाची आहे. महायुतीचे सरकार पुन्हा कसे आणता येईल. यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कार्यकर्त्यांना केले.
यंदाच्या निवडणुकीत आपला सिंहाचा वाटा नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जसा आनंद आहे, तशीच मनात सल आहे. 2014 आणि 2019 ला आपण जो सिंहाचा वाटा उचलला होता तो आता आपण उचलला नाही. आता आपल्याला पुन्हा एकदा रणनीती ठरवता यावी. पराभवाची कारणे शोधून ती कशी दूर करता येईल यासाठी आज निर्धार केला. उन्हाळा संपत आहे काहीली पण संपत आहे. पावसाळा जवळ आलाय . पाऊस पडताना जे पेरले जाते ते उगवत. आपण नव्याने पेरण्याची वेळ आलेली आहे, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
Join Our WhatsApp Community