कोरोना चाचण्या घटल्याबरोबर घटली रुग्ण संख्या!

कोविड बाधित रुग्ण आणि अति जोखमीच्या रुग्णांची संख्या यावर आधारीत कोविड चाचण्या करण्यात येतात. सध्या अति जोखमीच्या संशयित रुग्णांचे प्रमाणही कमी झाल्याने कोविड चाचण्या कमी होत आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

112

मुंबईतील कोविड बाधित रुग्णांची संख्या आता कमी होवू लागली असून कमी झालेल्या कोविड चाचण्यांमुळे रुग्ण आकडा घटलेला पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून कोविड चाचण्यांची संख्या कमी झालेली आहे. सोमवारी दिवसभरात १७ हजार ८६५ कोविड चाचण्या झाल्या. त्यामध्ये ६७६ रुग्ण संख्या आढळून आलेली आहे.

दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण कमी!

मुंबईत रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून हजाराच्या आसपास असताना सोमवारी ती सातशेच्या आतमध्ये पाहायला मिळाली. परंतु प्रत्येक वेळी कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यानंतर रुग्ण आकडा कमी झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यात अंशत: लॉकडाऊन करण्यापूर्वी म्हणजे २६ ते २७ मार्च रोजी अनुक्रमे ४७ हजार ५०४ आणि ४८ हजार ०७६ कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या. या दोन्ही दिवशी अनु्क्रमे ५,५१३ आणि ६,१२३ रुण आढळून आले होते. त्यामुळे राज्यासह मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्यासाठी कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आणि आता दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात येत आहे. त्यामुळे ३० आणि ३१ मे रोजी या तुलनेत कोविड चाचण्या कमी करण्यात आल्या आहेत. या दोन्ही दिवशी अनुक्रमे २४ हजार आणि १७ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा : ठाकरे सरकामधील तिसरी ‘विकेट’ पडणार?)

संशयित रुग्णांचे प्रमाणही कमी झाल्याने चाचण्या कमी! – आरोग्य अधिकारी

त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोविड बाधित रुग्ण आणि अति जोखमीच्या रुग्णांची संख्या यावर आधारीत कोविड चाचण्या करण्यात येतात. सध्या अति जोखमीच्या संशयित रुग्णांचे प्रमाणही कमी झाल्याने कोविड चाचण्या कमी होत आहे. ज्याप्रमाणे बाधित रुग्णांची संख्या आणि संशयित रुग्णांची संख्या वाढते, त्याप्रमाणे कोविड चाचण्या वाढवल्या जातात. बऱ्याचदा कोविड चाचण्या मोठ्या प्रमाणात करूनही बाधित रुग्ण कमी आढळून आलेले आहेत,असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • ३१ मे : रुग्ण संख्या – ६७६   (चाचण्या  : १७,८६५)
  • ३० मे : रुग्ण संख्या – १,०६६ (चाचण्या  : २४,५४८)
  • २९ मे : रुग्ण संख्या – १,०४८ (चाचण्या  : २५,७५१)
  • २८ मे : रुग्ण संख्या – ९२९    (चाचण्या : २९,५७३)
  • २७ मे : रुग्ण संख्या – १,२६६ (चाचण्या : २८,४८०)
  • २६ मे : रुग्ण संख्या – १,३६२ (चाचण्या  : २९,५७९)
  • २५ मे : रुग्ण संख्या – १,०३७ (चाचण्या  : २०,९९०)
  • २४ मे : रुग्ण संख्या – १,०५७ (चाचण्या  : २१,९४७)
  • २३ मे : रुग्ण संख्या – १,४३१  (चाचण्या  : २३,३१४)
  • २२ मे : रुग्ण संख्या – १,२९९  (चाचण्या  : २९,२६४)
  • २१ मे : रुग्ण संख्या – १,४१६  (चाचण्या  : ३३,०७८
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.