PUNE : पक्ष्यांनी विमानांचा मार्ग रोखल्याने प्रवाशांचा प्रवास खोळंबला

181
PUNE : पक्ष्यांनी विमानांचा मार्ग रोखल्याने प्रवाशांचा प्रवास खोळंबला

अन्नाच्या शोधात निघालेल्या पक्ष्यांनी विमानांचा मार्ग रोखल्याने प्रवाशांचा प्रवास खोळंबला. पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात पक्षी आढळून आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (ATC) सुमारे एक तासासाठी धावपट्टी बंद ठेवली. त्याचा फटका ८ विमानांना बसला. (PUNE)

दिल्लीहून पुण्याला आलेल्या विमानाला ‘गो अराउंड’ देण्यात आल्याने ते विमान विमानतळाच्या परिसरात घिरट्या मारून अखेर मुंबई विमानतळावर उतरले, तर चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या विमानाला हैदराबाद विमानतळावर उतरावे लागले. ६ विमानांना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे तीन ते साडेतीन तास उशीर झाला. पुणे शहर व परिसरात मागील दोन ते तीन दिवसांत मोठा पाऊस झाला. (PUNE)

(हेही वाचा – Rahul Gandhi : लोकसभेतील वजन वाढताच गांधी घराणे म्हणते…, खरगे, आता तुम्ही निघा)

विमानतळाच्या परिसरात हिरवळ आणि कीटकांची संख्या वाढली आहे. आपल्या भक्ष्याच्या शोधात असलेल्या पक्ष्यांचा थवा सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान धावपट्टी जवळ आढळून आला. त्यानंतर पुढील धोका ओळखून धावपट्टीवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा मोठा फटका पुण्याला येणाऱ्या २ विमानांच्या प्रवाशांना बसला. (PUNE)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.