Lok Sabha Election 2024 : राज्यातून तब्बल ७ महिला खासदार लोकसभेत

247
Lok Sabha Election 2024 : राज्यातून तब्बल ७ महिला खासदार लोकसभेत

देशाच्या संसदेने महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण लागू केल्याचा समाधानकारक फायदा नुकत्याच निवडून आलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेला असून त्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सर्वाधिक चार महिला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक, व भाजपाच्या दोन अशा सात महिला खासदार निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र असे असले तरी नेहमी पुरोगामी राज्य म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी हे नक्कीच भूषणावह नसल्याचे मानले जाते. कारण २०१९ मध्ये हिच संख्या ८ होती. (Lok Sabha Election 2024)

यंदा म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तारूढ महायुती व विरोधी महाविकास आघाडी यांनी एकूण १७ महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यात एकूण १४ निवडून आलेल्या खासदारांमध्ये ४ महिला खासदार निवडून आलेल्या आहेत. त्यात उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड, सोलापुर – प्रणिती शिंदे, चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर, व धुळे – शोभा बच्छाव यांचा समावेश आहे. त्याखालोखाल भाजपा, पैकी रावेर – रक्षा खडसे, व जळगाव – स्मिता वाघ तर नेहमीच आपणच महिला आरक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते असल्याच्या नादात वावरणारे शरद पवार यांच्या पक्षाने या निवडणूकीत १० जागा लढवल्या पण बारामतीमधील स्वतःची मुलगी सुप्रिया सुळे ज्या २०१९ लाही खासदार होत्याच यांनाच निवडून आणले. त्यामुळे का होईना त्यांनी आपल्या चेहऱ्यावर पांघरलेला महिला आरक्षणाचा बुरखा मात्र टराटरा फाटला आहे. मात्र त्यातही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या सात विविध पक्षीय महिला निवडून आल्या आहेत त्यांनी निवडून येण्यासाठी आपल्या समोरच्या पुरुष उमेदवारांशी कडवी झुंज देऊन आल्या आहेत सुप्रिया सुळे वगळून हे विशेष. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – PUNE : पक्ष्यांनी विमानांचा मार्ग रोखल्याने प्रवाशांचा प्रवास खोळंबला)

आता संपुर्ण देशाचा विचार केला तर २०२४ च्याच निवडणुकीत संसदेत एकूण ७४ महिला खासदार निवडून आल्या असून ज्यात सर्वात जास्त ११ ममतांच्या प. बंगालमधून त्याखालोखाल मुख्यमंत्री योगी असलेल्या उत्तर प्रदेश मधून ७ महिला खासदार निवडून आल्या आहेत हे विशेष. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.