काँग्रेस (Congress) संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदासाठी सोनिया गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला काँग्रेसचे नेते गौरव गोगोई, तारिक अन्वर, के.सुधाकरन यांनी या ठरावाला पाठिंबा दिला.
(हेही वाचा – Ghatkopar Hoarding incident : माजी संचालिकेसह दोन जणांना गोव्यातून अटक)
अधीररंजन चौधरी होते आधीचे नेते
सोनिया गांधी पुन्हा काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवडून आल्या, हे चांगले आहे. त्या आम्हाला मार्गदर्शन करत रहातील, अशी भावना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली आहे. २०१९ च्या सरकारमध्ये काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी हे पक्षाचे संसदीय नेते होते. आता तेच पद पुन्हा एकदा गांधी घराण्यातील सोनिया गांधी यांना देण्यात आले आहे.
गांधी घराण्यातील नेत्यांचीच विविध पदांवर नियुक्ती
दुपारी झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (Congress Working Committee) सदस्यांनी राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त करण्याविषयी प्रस्ताव संमत केला आहे. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर (Loksabha Election 2024) स्थापन झालेल्या लोकसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. याच मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसच्या पडत्या काळात नेतृत्व घेऊन काम केले. आता काही राज्यांत काँग्रेसचे वजन वाढताच पुन्हा गांधी घराण्यातील नेत्यांचीच विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community