गेल्या पंधरा वर्षात सर्वसामान्य जनतेची माहिती नाही पण खासदारांची श्रीमंती निश्चित वाढली आहे. २००९ पासून करोडपती खासदारांच्या संखेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील शिवसेना (शिंदे), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गट आणि अजित पवार यांचे १०० टक्के खासदार करोडपती असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. (Lok Sabha Elections)
शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादीचे सगळेच कोट्यधीश
नुकतेच निवडून आलेल्या लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांपैकी, महाराष्ट्रातले ९८ टक्के खासदार करोडपती आहेत. त्यात शिवसेना (शिंदे), शिवसेना उबाठा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले सर्वच्या सर्व खासदार करोडपती असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ८८ टक्के खासदारांचा समावेश आहे. यात शिवसेनेचे ७, शिवसेना उबाठाचे ९, राष्ट्रवादी (शप) ८ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या एका खासदाराचा समावेश आहे. तर देशभरात भाजपाचे २४० पैकी ९५ टक्के तर काँग्रेसचे ९९ पैकी ९३ टक्के खासदार करोडपती आहेत. (Lok Sabha Elections)
(हेही वाचा – लोकसभेत पडद्याआड पाडापाडी; विधानसभेत उघडपणे उमेदवार पाडणार… Manoj Jarange यांची दर्पोक्ती)
मनमोहन सरकार काळात ३० टक्क्यांची वाढ
देशभरात २००९ मध्ये एकूण ५४३ खासदारांपैकी कोट्यधीश खासदारांची संख्या ३१५ म्हणजे साधारण ५८ टक्के होती, ती केवळ पाच वर्षात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात २००९-२०१४ मध्ये तब्बल ३० टक्क्यांनी वाढून ४४३ म्हणजेच ८२ टक्क्यांवर गेली. तर गेल्या १० वर्षात, मोदी सरकारच्या काळात, कोट्यधीश खासदारांची संख्या १३ टक्क्यांनी वाढून २०२४ मध्ये ५०४ म्हणजेच ९३ टक्क्यांवर गेली. याचा अर्थ गेल्या १५ वर्षात खासदारांची आर्थिक प्रगती झाली, मात्र जनता आहे तिथेच आहे. (Lok Sabha Elections)
सगळ्यात श्रीमंत, गरीब खासदार
नुकत्याच निवडून आलेल्या खासदारांमध्ये देशभरात सगळ्यात श्रीमंत खासदार ‘टीडीपी’ पक्षाचे आंध्र प्रदेशचे चंद्रशेखर पेम्मसानी असून त्यांची मालमत्ता जवळपास ५,७०५ कोटी रुपये आहे तर सगळ्यात गरीब खासदार पश्चिम बंगालमधील भाजपाचे ज्योतिर्मय महातो असून त्यांची मालमत्ता जवळपास ६ लाख रुपये आहे. लोकसभेच्या ५४३ खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे अभ्यास केल्यानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी विश्लेषण वरील निष्कर्ष काढले आहेत. (Lok Sabha Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community