काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी रविवारी (९ जून) होत असून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. आठवले यांच्या पक्षाकडून शनिवारी याबाबत माहिती देण्यात आली. (Ramdas Athawale)
रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा गट २०१४ पासून भाजपा सोबत आहे. आठवले यांचा जुलै २०१६ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये त्यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत आठवले यांच्या गटाला एकही जागा मिळाली नव्हती. तरीही आठवले यांनी भाजपा आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांसाठी अनेक राज्यात प्रचारसभा घेतल्या होत्या. (Ramdas Athawale)
(हेही वाचा – Crime : कौटुंबिक वादातून दोन कुटुंबात हाणामारी; १ ठार, ४ जखमी)
आता केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ होत असल्याने रामदास आठवले (Ramdas Athawale) गटाच्या मंत्रिपदाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. आठवले यांना पुन्हा केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळणार की बढती होऊन स्वतंत्र प्रभार असलेले खाते किंवा कॅबिनेट मंत्रिपद मिळणार याविषयी आठवले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. (Ramdas Athawale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community