जून महिन्याचा पहिला आठवडा गेला तरी पाऊस (Mumbai Rain) पडेना म्हणून नागरिक चिंतेत होते. प्रचंड उकाड्याने मुंबईकरांची दैना उडाली होती. पाऊस कधी पडणार? याची सर्वजण वाट पाहत होते. अखेर मुंबईकरांच्या रविवारची पहाट रिमझिम सरींनी झाली आहे. ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. (Mumbai Rain)
And it is confirmed, Heavy to very heavy rain in Mumbai & MMR on 9-11 June, 2024 🔴
Amidst IMD issuing ‘heavy rain warning’ for Mumbai & Thane, during the monsoon onset dates itself, Mumbai & adjoining areas will receive heavy to very heavy rains on 9-10 June amid vortex forming… https://t.co/sVQcFdjmPm pic.twitter.com/LU17QjxRT3
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) June 7, 2024
मुंबई, डोंबिवली, मीरा-भाईंदर परिसरात पहाटे पावसाच्या सरी (Mumbai Rain) पाहायला मिळाल्या. जून महिन्याच्या 9, 10 तारखेला शहरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान पहिल्याच दिवशी पाऊस मोठी बॅटींग करायच्या तयारीत आहे. कारण मुंबई, ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने मुंबईकरांनी शक्य असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Rain)
And it is confirmed, Heavy to very heavy rain in Mumbai & MMR on 9-11 June, 2024 🔴
Amidst IMD issuing ‘heavy rain warning’ for Mumbai & Thane, during the monsoon onset dates itself, Mumbai & adjoining areas will receive heavy to very heavy rains on 9-10 June amid vortex forming… https://t.co/sVQcFdjmPm pic.twitter.com/LU17QjxRT3
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) June 7, 2024
उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस (Mumbai Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान विभागाने दिलाय. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहणार आहे. तर संध्याकाळ / रात्री हलका ते मध्यम पाऊस असेल. किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सियस आणि 28 अंश सेल्सियसच्या आसपास असेल. (Mumbai Rain)
कोंकण आणि मध्य महाराष्ट्रतील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/QIBK8JgmFM
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 8, 2024
हेही पहा –
Join Our WhatsApp Community