Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग बंद होणार? वाचा सविस्तर

8510
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग बंद होणार? वाचा सविस्तर
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग बंद होणार? वाचा सविस्तर

मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्गावरील वाहतूक आता धोकादायक बनली आहे. आता प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर मुंबई गोवा हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. (Mumbai Goa Highway)

मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) संगमेश्वरमधील धामणी येथे रेल्वे ब्रीजच्या जवळ संरक्षक भिंतीचं सुरू असलेल्या रस्त्याचं काम सध्या बंद आहे. डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आता ऐन पावसाळ्यात रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Mumbai Goa Highway)

गेल्या अनेक दिवसांपासून काम बंद

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. अशा स्थितीत पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) ही परिस्थिती समोर आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गावरील संगमेश्वरजवळील संरक्षक भिंतीचं काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याचा फटका आता नुकत्याच झालेल्या पावसात बसल्याचं दिसून आलं. या ठिकाणचा रस्ता आता खचताना दिसत आहे. (Mumbai Goa Highway)

डिझेलचा तुटवडा

अशीच परिस्थिती कायम राहिली तर या महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खचणाऱ्या रस्त्याला कुठेही पर्यायी मार्ग नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून डिझेलचा तुटवडा असल्याचं सांगितलं जातंय. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा महामार्ग बंद आहे. येत्या चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच हा भराव अधिक खचत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. त्यामुळे ऐन पावसाच्या सुरुवातीला मुंबई गोवा महामार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Mumbai Goa Highway)

मुंबई गोवा हायवेवर दरड कोसळली!

महाड शहरालगत असणाऱ्या नडगांव परिसरातील महामार्ग परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. पावसाची संततधार आणि झिरपलेली माती यामुळे या परीसरात महामार्गावर एका ठिकाणी दरड कोसळली.दरड कोसळल्यानंतर वाहतूक काही वेळ ठप्प पडली होती. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.मॉन्सून पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. (Mumbai Goa Highway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.