हॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेकदा आपण एखाद्या महाकाय अजगराने एखाद्या व्यक्तीला जिवंत गिळल्याची (Video Python Swallows Woman Whole) दृष्यं पाहिली असतील. मात्र इंडोनेशियामध्ये खरोखरच एका अजगराने महिलेला जिवंत गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेंट्रल इंडोनेशियामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिल्याचं वृत्त ‘एएफपी’ या वृत्तसंस्थे दिलं आहे. (Video Python Swallows Woman Whole)
(हेही वाचा –Rain Alert: पुण्यात मुसळधार, तर सिंधुदुर्गात रेड अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा? जाणून घ्या..)
अजगराने गिळलेल्या माहिलेची ओळख पटली आहे. या महिलेचं नाव फरिदा असं असून ती 45 वर्षांची होती. दक्षिण सुलावेसी प्रांतातील कालेमपांग गावात फरिदा तिच्या कुटुंबाबरोबर वास्तव्यास होती. (Video Python Swallows Woman Whole) फरिदाला अजगराने गिळल्याचं पहिल्यांदा तिच्या पतीच्याच लक्षात आलं. फरिदाला चार मुलं असून ती 6 जूनच्या सायंकाळी अचानक बेपत्ता झाली. ती घरी न आल्याने स्थानिक प्रशासनाबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध सुरु केला. गावातील अनेक नागरिक तिच्या शोधकार्यामध्ये सहभागी झाले होते असं गावाचे प्रमुख असलेल्या सुराडी रोसाई यांनी ‘एएफपी’ला सांगितलं. (Video Python Swallows Woman Whole)
(हेही वाचा –Konkan Railway: कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात १० जूनपासून बदल, जाणून घ्या…)
फरिदाच्या पतीला तिच्या वस्तू एका निर्जनस्थळी आढळून आल्या. त्यानंतरच त्याला भलतीच शंका आली. गावकऱ्यांनी ज्या ठिकाणी या वस्तू सापडल्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. आम्हाला त्याच भागामध्ये एक पोट फुगलेला भल्या मोठ्या आकाराचा अजगर आढळून आला, (Video Python Swallows Woman Whole) असं सुराडी यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनी या अजगराचं पोट फाडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अजगराचं पोट फाडलं असता त्यामधून फरिदाचं डोकं बाहेर आलं. असं सुराडी म्हणाले. फिरादाला ज्या कपड्यांमध्ये घराबाहेर पडली होती त्याच कपड्यांमध्ये तिचा देह अजगराच्या पोटात सापडला. तिला अजगराने जसेच्या तसे गिळले होते. हा अजगर 5 मीटरचा म्हणजेच 16 फुटांचा होता. (Video Python Swallows Woman Whole)
व्हिडीओ :
Tragedy struck the village of Kalempang, Indonesia, on June 6, 2024. Farida, a 50-year-old woman, vanished while in the nearby forest.
A search party formed by local men ventured into the woods in the following days. Their search led them to a massive, 20-foot python.
The… pic.twitter.com/YmGgDmfpeG
— Morbid Knowledge (@Morbidful) June 8, 2024