Konkan Railway: कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात १० जूनपासून बदल, जाणून घ्या…

कोकणामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमामात पाऊस पडतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो.

157
Konkan Railway: कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात १० जूनपासून बदल, जाणून घ्या...
Konkan Railway: कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात १० जूनपासून बदल, जाणून घ्या...

पावसाळा सुरू झाला की, कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो. यंदाही तसा बदल करण्यात आला असून सोमवार, १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू होणार आहे. (Konkan Railway)

कोकणामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमामात पाऊस पडतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो. यंदाही कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे वेळापत्रक १० जूनपासून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. या वेळापत्रकानुसार पुढीलप्रमाणे गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. (Konkan Railway)

मडगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक
कोकणकन्या एक्सप्रेस – मडगाव येथून ६ वाजता सुटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वा. ४० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
वंदेभारत एक्सप्रेस – मडगाव येथून दुपारी साडे बारा वाजता सुटेल आणि संध्याकाळी १०वा. ३५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
जनशताब्दी एक्सप्रेस – मडगाव येथून दुपारी  १२ वाजता सुटेल आणि रात्री ११  वा. ५५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
मांडवी एक्सप्रेस – मडगाव येथून सकाळी साडे आठला सुटेल आणि रात्री ९ वा. ४५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
मडगाव एलटीटी एक्सप्रेस – मडगाव येथून सकाळी साडे अकरा वाजता सुटेल आणि रात्री ११  वा. ३५ मिनिटांनी एलटीटी पोहचेल.
तेजस एक्सप्रेस – मडगाव येथून दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि रात्री १२ वा. २० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल तसेच जनशताब्दी एक्सप्रेस, मंगलूरू-मुंबई एक्स्प्रेस आणि तेजस एक्सप्रेस ७ जुलैपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून मडगावला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक
कोकणकन्या एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाली ११ वा. ४० मिनिटांनी मडगावला पोहचेल.
वंदेभारत एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५ वा. २५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी साडेतीन वाजता मडगावला पोहचेल.
जनशताब्दी एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५ वा. १० मिनीटांनी सुटेल आणि सायंकाळी साडेचार वाजता मडगावला पोहचेल.
मांडवी एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ७ वा. १० मिनीटांनी सुटेल आणि रात्री ९ वा. ४५ मिनीटांनी मडगावला पोहचेल.
मडगाव एलटीटी एक्सप्रेस – एलटीटी येथून रात्री १२ वा. ४५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता मडगावला पोहचेल.
तेजस एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५ वा. ५० मिनिटांनी सुटेल आणि सायंकाळी ५ वाजता मडगावला पोहचेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.