एनडीए (NDA) सरकारचा आज तिसरा शपथविधी आहे. त्यासाठी सर्वांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुपारपर्यंत फोन येणे अपेक्षित होते; परंतु फोन न आल्याने राष्ट्रवादीला या टप्प्यात मंत्रीपद मिळणार नाही का, अशा चर्चा रंगल्या आहेत. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी याविषयीची माहिती दिली.
(हेही वाचा – Narendra Modi Oath Ceremony : NDA च्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे? आतापर्यंत ३७ खासदारांच्या नावावर शिक्कामोर्तब)
सुनील तटकरेंच्या घरी बैठक सुरू
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत सुनील तटकरेंच्या घरी बैठक सुरू आहे. या बैठकीला प्रफुल्ल पटेल देखील पोहचले आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे नाव मंत्रीपदासाठी नाव आघाडीवर होते. त्यांना फोन येईल, अशी अपेक्षा होती, परंतु दुपारी 12 पर्यंत पटेलांना फोन आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अमोल मिटकरी याविषयी म्हणाले की, मंत्रीमंडळात कोण शपथ घेणार, हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. संध्याकाळी 7.15 ला शपथविधी आहे तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजपा खासदार रक्षा खडसे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ, नितीन गडकरी, प्रतापराव जाधव आणि पियुष गोयल हेही आज शपथ घेणार आहेत.
हेही पहा –