Murlidhar Mohol: “खासदार म्हणून दिल्लीत आलो आणि…”, मोहोळ झाले भावूक!

604
Murlidhar Mohol:
Murlidhar Mohol: "खासदार म्हणून दिल्लीत आलो आणि...", मोहोळ झाले भावूक!

पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी (PM Modi Oath Taking Ceremony) लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 30 ते 40 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचाही समावेश आहे.

(हेही वाचा –NDA Govt : महापौर ते केंद्रात मंत्रीपद! दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन)

या पार्श्वभुमीवर बोलताना खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले, “हा संपूर्ण पुणे शहराचा सन्मान आहे. बहुमान आहे. मी संध्याकाळी शपथ घ्यायची असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक पुणेकरासाठी ही आनंदाची बातमी आहे की, या शहराचे प्रतिनिधीत्व करणारा आपला खासदार आहे. तो देशाच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून आता काम करणार आहे. मी समस्त पुणेकरांना हे श्रेय देतो. नरेंद्र मोदींनी मला मार्गदर्शन केलं आहे. पुढच्या काळात मनापासुन काम करायचं आहे.” असं ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना ते म्हणाले. (Murlidhar Mohol)

(हेही वाचा –Narendra Modi Oath Ceremony : NDA च्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे? आतापर्यंत ३७ खासदारांच्या नावावर शिक्कामोर्तब)

मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून सकाळी फोन आला. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार (Murlidhar Mohol) झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाले. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. मुरलीधर मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत. (Murlidhar Mohol)

(हेही वाचा –NDA सरकारमध्ये NCP ला मंत्रीपद नाही ?, फडणवीस पोहोचले थेट दिल्लीतील तटकरेंच्या घरी)

पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. त्यामुळे कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठऱणारा आहे. (Murlidhar Mohol)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.