९ जून रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील ६ नेते शपथ घेणार आहेत. मात्र गेल्या कार्यकाळात मंत्रीपदी असलेले आणि राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले भाजपकडून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर यांनीही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. मात्र त्यांना अजून फोन गेलेला नाही.
(हेही वाचा – Pankaja Munde यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी परळी बंदचे आवाहन, नेमकं काय झालं? जाणून घ्या…)
महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार
गृह, वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र यांसारखी महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण आणि संस्कृतीसारख्या भक्कम वैचारिक बाबी असलेल्या दोन मंत्रालयांची कमानही भाजप खासदारांकडे जाऊ शकते. मित्र पक्षांना पाच ते आठ मंत्रायले मिळू शकतात, असे मानले जात आहे.
सरकारमधील 20 मंत्री पराभूत
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) मोदी सरकारमधील 20 मंत्री पराभूत झाले आहेत. महाराष्ट्रातून दुसऱ्या मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले नारायण राणे, तसेच भागवत कराड यांना एनडीए सरकारमध्ये स्थान मिळालेले नाही. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले भाजप नेते अनुराग ठाकूरही एनडीए सरकारमध्ये दिसणार नाहीत, अशा चर्चा चालू आहेत. अनुराग ठाकूर यांनी हमीरपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सतपाल सिंह रायजादा यांचा सुमारे 2 लाख मतांनी पराभव केला आहे. यापूर्वीही त्यांनी या जागेवर निवडणूक जिंकली आहे.
आतापर्यंत कोणत्या नेत्यांची नावे मंत्रीपदासाठी आहेत पुढे ?
- डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी)
- किंजरापू राम मोहन नायडू (टीडीपी)
- अर्जुन राम मेघवाल (भाजपा)
- सर्बानंद सोनोवाल (भाजपा)
- अमित शहा (भाजपा)
- कमलजीत सेहरावत (भाजपा)
- धर्मेंद्र प्रधान प्रधान (भाजपा)
- मनोहर लाल खट्टर (भाजपा)
- नितीन गडकरी (भाजपा)
- राजनाथ सिंह (भाजपा)
- पियुष गोयल (भाजपा)
- ज्योतिरादित्य सिंधिया (भाजपा)
- शंतनू ठाकूर (भाजपा)
- रक्षा खडसे (भाजपा)
- राव इंद्रजित सिंग (भाजपा)
- सुरेश गोपी (भाजपा)
- कीर्तिवर्धन सिंग (भाजपा)
- मनसुख मांडविया (भाजपा)
- डॉ जितेंद्र सिंग (भाजपा)
- जुआल ओरम (भाजपा)
- गिरीराज सिंह (भाजपा)
- हरदीप सिंग पुरी (भाजपा)
- जी किशन रेड्डी (भाजपा)
- बंदी संजय किशोर (भाजपा)
- भगीरथ चौधरी (भाजपा)
- सीआर पाटील (भाजपा)
- प्रतापराव जाधव (शिवसेना)
- एचडी कुमारस्वामी (जेडीएस)
- चिराग पासवान (लोजप-आर)
- जयंत चौधरी (RLD)
- अनुप्रिया पटेल (अपना दल)
- जीतन राम मांझी (HAM)
- रामदास आठवले (आरपीआय)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community