Flamingo Death: फ्लेमिंगोच्या मृत्यूची हरित न्यायाधीकरणाकडून दखल; राज्य वनविभाग आणि पाणथळ प्राधिकारणांना बजावल्या नोटिसा

199
Flamingo Death: फ्लेमिंगोच्या मृत्यूची हरित न्यायाधीकरणाकडून दखल; राज्य वनविभाग आणि पाणथळ प्राधिकारणांना बजावल्या नोटिसा

पक्षी प्रेमीसाठी मुंबई खाडीत येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षी हे आकर्षणाचे ठिकाण आहे. अशातच मुंबईतील घाटकोपरमधील पंतनगर येथील लक्ष्मी नगर परिसरात २० मे च्या मध्य रात्री एमिरेट्सच्या विमानाची धडक होऊन ३६ फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. वनविभागाने मृत फ्लेमिंगोला शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाच्या लँडिंगवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र नवी मुंबईतील नेरुळ राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या (National Green Tribunal) प्रधान खंडपीठाने येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाजवळ (DPS Flamingo Lake) फ्लेमिंगोच्या मृत्यूची स्वत:हून दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या (एनजीटी) प्रधान खंडपीठाने सिडको, राज्य वनविभाग आणि पाणथळ प्राधिकरण यांना नोटिसा बजावल्या आहेत. (Flamingo Death) 

नोटीसमध्ये पर्यावरणीय नियमांचे पालन करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत. विशेषत: वेटलँड (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, २०१७ च्या तरतुदींचे पालन; जैविक विविधता कायदा, २००२ आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ बाबत एनजीटीने टिप्पणी केली आहे. एनजीटी अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने फ्लेमिंगोच्या मृत्यूचे प्रकरण पश्चिम विभागाकडे वर्ग केले आणि सुनावणीसाठी १८ जुलैची तारीख निश्चित केली आहे.

नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार (BN Kumar) यांनी निदर्शनास आणून दिले की, सिडकोने नेरुळ येथील वाहतूक जेट्टीच्या अर्थात टर्मिनलच्या कामामुळे आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही असे सिडकोने (CIDCO) म्हटले असताना स्वत:च्या कामात नियमांचे उल्लंघन केले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरण मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटींचे हे उल्लंघन आहे. आणि पाण्याचा प्रवाह आणि जीवजंतू अबाधित आहे याची खात्री करण्यासाठी राज्याने दिलेल्या सरकारी आदेशाचेही उल्लंघन केले आहे. (Flamingo Death)

जबाब नोंदवण्याचे निर्देश

फ्लेमिंगोच्या मृत्यूचे कारण ह्यप्रकाश प्रदूषणह्ण असू शकते, जे त्यांच्या नाजूक डोळ्यांमुळे पक्ष्यांची दृष्टी अंशत: बिघडवते. त्यात असे नमूद केले आहे की, पक्ष्यांना उडताना नवीन स्थापित एलईडी दिवे दिशाभूल करतात, असे एनजीटीने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे एनजीटीने प्रधान मुख्य वनसंरक्षक-नागपूर, महाराष्ट्र वेटलँड प्राधिकरण, सिडको आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पश्चिम विभागीय खंडपीठासमोर जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. (Flamingo Death) 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.