पुणे शहराला (Pune Rains) पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर धरण परिसरात मान्सून पूर्व पाऊस काही परिसरात पडला आहे. खडकवासला येथे पन्नास मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद जलविज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर झाली आहे.
खडकवासला परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात
खडकवासला परिसरात संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. खडकवासला धरण परिसरातील काही गावांमध्ये, तसेच खेडशिवापूर परिसरात देखील पाऊस पडला. त्यानंतर, महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पाणी साठले होते. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, खडकवासला किरकटवाडी, नांदेड येथेही पावसाच्या सरी सुमारे दीड तासाहून अधिक वेळ कोसळत होत्या. वारजे महामार्गावर आणि सेवा रस्त्यांवर एक दीड फुटापेक्षा जास्त पाणी साठलेले होते.
राज्यात ठिकठिकाणी पावसाला दमदार सुरुवात झाली. मुंबईतील दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात पाऊस सुरू आहे. तर, कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यात पाऊस जोरदार बॅटिंग करत आहेत. पुण्यात पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट तर, संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात पावसाचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईत वरुणराजाचे आगमन
९ जून रोजी पहाटेपासून मुंबईत ठिकठिकाणी वरुणराजाचे आगमन झाले आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, कुर्ला, घाटकोपर, कुलाबा, दादर, अंधेरी, वांद्र्यात पावसाने हजेरी लावली. पुढील 3-4 तास मुंबईत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तर, तशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community