नरेंद्र मोदी यांनी रविवार, ९ जून रोजी सायंकाळी एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधानपदाची शपथ तिसऱ्यांदा घेऊन हॅटट्रीक केली. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला २४२ जागांवर विजय मिळून तो सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात ७० खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. (Modi 3.0)
(हेही वाचा – Modi 3.0 : राष्ट्रवादीने नाकारले राज्यमंत्री पद; Ajit Pawar कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रही)
यापूर्वी सकाळी मोदी हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी गेले. मोदींनी अटल स्मृती स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील युद्ध स्मारकावर पोहोचून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. (Narendra Modi Oath Ceremony)
हेही पहा –