Cyber ​​Crime: नाशिकमध्ये सायबर भामट्यांनी पोलिसाचेच बँक खाते केले रिकामे

253
Cyber ​​Crime : १९३० या हेल्पलाईन क्रमांकावरून ९ महिन्यात ११४.३६ कोटी रुपये गोठविले
Cyber ​​Crime : १९३० या हेल्पलाईन क्रमांकावरून ९ महिन्यात ११४.३६ कोटी रुपये गोठविले

नाशिक भाजी बाजारात (Nashik vegetable market) पोलिसाचा चोरीस गेलेल्या मोबाईलच्या माध्यमातून भामट्यांनी पोलीसाचे बँक खाते रिकामे केले आहे. ही रक्कम फोन पे (Phone Pay) आणि युपीआय (UPI) आयडीवरून परस्पर कोलकाता येथील एका बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. देवळाली कॅम्प (Devali Camp) येथील पोलीस कर्मचा-यास सायबर भामट्यांनी हा गंडा घातला आहे. (Cyber ​​Crime)

(हेही वाचा – Modi 3.0 : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची हॅटट्रीक; राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्याला सुरुवात)

या प्रकरणी दिपक सखाराम सरकटे (रा.पोलीस कॉर्टर बिल्डींग,दे.कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सरकटे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अंमलदार पदावर कार्यरत असून गेल्या ते भाजीपाला खरेदी करण्यासाठी देवळाली कॅम्प येथील आठवडे बाजारात गेले होते. गर्दीत चोरट्यांनी हात की सफाई दाखवत त्यांच्या ओपो कंपनीच्या मोबाईलवर डल्ला मारला होता. हा प्रकार सरकटे घरी परतल्यानंतर उघडकीस आला होता.

(हेही वाचा – Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात समावेश झालेल्या नवनिर्वाचित खासदारांचे देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन; म्हणाले…)

दुस-या दिवशी पोलीसात तक्रार देण्याच्या तयारीत असलेल्या सरकटे यांना चोरट्यांनी दुसरा धक्का दिला. मध्यरात्री भामट्यांनी मोबाईलमधील फोन पे आणि युपीआय आयडीचा वापर करून सरकटे यांच्या बँक खात्यातील ९९ हजार रूपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन कलकत्ता येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळया दोन खात्यांवर वर्ग करून घेतली. त्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा ९६० रूपयांची ऑनलाईन खरेदी करण्यात आल्याने अंमलदार असलेल्या सरकटे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिवाजी अहिरे करीत आहेत. (Cyber ​​Crime)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.