जितन मांझी एकमेव खासदार तरीही कॅबिनेट मंत्रिपद; Modi 3.0 मधील लक्षवेधी निर्णय

जितन मांझी हे बिहारमधून येतात. त्यांचा हम नावाचा स्वतःचा पक्ष आहे.

252
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन जवाहरलाल नेहरू यांच्याशी बरोबरी केली, पण मोदी सरकार ०.३ (Modi 0.3) मध्ये मूलभूत बदल आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत होते, त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांना सरकारमध्ये केवळ नावाला अस्तित्व प्रदान केले होते, पण २०२४ मध्ये भाजपाला एकट्याला स्वबळाची आकडा पार करता आला नाही, त्यामुळे त्यांना एनडीएतील घटक पक्षांना सरकारमध्ये त्यांच्या अपेक्षित स्थान द्यावे लागले आहे. त्यामुळे केवळ एकमेव खासदार निवडून आलेले बिहारमधील  जितन मांझी यांना मोदी सरकार ०.३ (Modi 0.3) मध्ये थेट कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले आहे.
जितन मांझी हे बिहारमधून येतात. त्यांचा हम नावाचा स्वतःचा पक्ष आहे आणि ते एकमेव खासदार म्हणून निवडून आले आहेत. गया या मतदारसंघातून मांझी निवडून आले आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिल्याने हा चर्चेचा विषय बनणार आहे. एक एक खासदार सांभाळून ठेवणे आता मोदी सरकारच्या समोर आव्हान असणार आहे, हेच या निर्णयातून दिसून येत आहे. मांझी यांचे बिहारमध्ये वेगळे अस्तित्व आहे. ते जुने जाणते नेते आहेत. (Modi 0.3)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.