जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) रियासी जिल्ह्यात रविवारी, ९ जून रोजी एका संशयित दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये स्थानिक लोक बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसून आले. तसेच रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी रस्त्याच्या कडेला येऊन उभ्या आहेत.
जम्मू-कश्मीरच्या (Jammu Kashmir) रियासी जिल्ह्यात यात्रेकरूची एक बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक अहवालानुसार दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. डीडी न्यूजने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी एका संशयित दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये स्थानिक लोक बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसून आले. तसेच रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी रस्त्याच्या कडेला येऊन उभ्या आहेत.
Join Our WhatsApp Community