Monsoon Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग, पुढचे ५ दिवस पावसाचे

204
Monsoon Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग, पुढचे ५ दिवस पावसाचे
Monsoon Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग, पुढचे ५ दिवस पावसाचे

राज्यत मान्सून (Monsoon Update) मोठ्या मुक्कामासाठी पोहोचला आहे. सध्याच्या घडीला या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगला जोर धरला असून, मुंबई पुण्यासह मराठवाड्यापर्यंत मजल मारली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी मान्सूनची (Monsoon Update) वेगानं प्रगती होताना दिसत असून देशाप्रमाणे राज्यातही तो अंदाजे वर्तवण्यात आलेल्या वेळेआधीच दाखल झाला. सर्वसाधारणपणे मान्सून मुंबईत 11 जूनला दाखल होतो. यंदा मात्र मान्सून मुंबईत (Mumbai Rain) दोन दिवस आधिच दाखल झाला आहे. (Monsoon Update)

(हेही वाचा –Mumbai Weather Update; मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी; मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सून दाखल )

भारतीय हवामान विभागाने याबाबतची अधिकृत घोषणा केली. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यादरम्यान, शहरासह उपनगरीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत: ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पावसाची एकंदर वाटचाल पाहता हवामान खात्याने ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुंबईसाठी यलो अलर्ट आणि कोकणात सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Monsoon Update)

(हेही वाचा –पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या Khadakwasla परिसरात 50 मिमी पाऊस)

आजही राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपी संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून काही ठिकाणी तुरळक पवासाची शक्यता आहे. तर पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Monsoon Update)

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

पहिल्याच पावसाचा जोर पाहता नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दादरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. पूर्व उपनगरातही पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती. त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला काही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. (Monsoon Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.